वायनाडमध्ये नव्या हरिदास देणार प्रियांका गांधींना टक्कर!

भाजपने दिली उमेदवारी

वायनाडमध्ये नव्या हरिदास देणार प्रियांका गांधींना टक्कर!

केरळमधील वायनाडमध्ये १३ नोव्हेंबर २०२४ रोजी लोकसभा पोटनिवडणूक होत आहे. अशा स्थितीत काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने कोणाला उमेदवारी दिली आहे. वायनाडमधून भाजपने नव्या हरिदास यांना उमेदवारी दिली आहे.

३९ वर्षीय नव्या हरिदास या भारतीय जनता पक्षाचा नवीन चेहरा नाहीयेत. त्या राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या मुख्य सचिव देखील आहेत. याशिवाय नव्याने दोनदा कोझिकोड कॉर्पोरेशनच्या काऊन्सिलरही राहिल्या आहेत. २०२१ च्या निवडणुकीतही भाजपने त्यांना काँग्रेसचे उमेदवार अहमद देवरकोविल यांच्या विरोधात उभे केले होते. या निवडणुकीत त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या. राजकारणासोबतच नव्या हरिदास मेकॅनिकल इंजिनिअरही आहे. २००७ मध्ये त्यांनी केएमसीटी अभियांत्रिकी महाविद्यालय, कालिकत विद्यापीठातून बीटेक केले आणि नंतर राजकारणात प्रवेश केला.

भाजपने वायनाडमधून उमेदवारी दिल्यानंतर त्या म्हणाल्या, वायनाडमध्ये प्रगतीची गरज आहे. काँग्रेस परिवार वायनाडच्या लोकांच्या गरजा पूर्ण करत नाही. या निवडणुकीनंतर वायनाडच्या रहिवाशांना संसदेत चांगल्या सदस्याची गरज आहे.

हे ही वाचा : 

हमासच्या सिनवारचा नवा व्हीडिओ, बायकोकडे दिसली २७ लाखांची बॅग!

परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याच्या प्रवृत्तीबद्दल उपराष्ट्रपतींकडून चिंता

दिल्लीतील CRPF शाळेजवळ मोठा स्फोट!

हैदराबाद पबमध्ये पोलिसांचा छापा

दरम्यान, राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात १३ एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसने प्रियंका वाड्रा यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपकडून त्यांच्याविरोधात महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस नव्या हरिदास उभ्या आहेत.तर सीपीआयने सत्यन मोकेरी यांना वायनाड मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

Exit mobile version