पुण्यातील भोसरी येथील ११ महिन्यांच्या वेदिका सौरभ शिंदेला स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी टाईप-वन हा दुर्मिळ आजार झाला होता. त्यावरील उपचारासाठी तिला पुण्यातील खासगी रुग्णालयात ‘झोलगेन्स्मा’ हे १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन दीड महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र रविवारी सायंकाळी तिचा दुर्दैवी अंत झाला. वेदिकाच्या उपचारासाठी लोकवर्गणीतून निधी उभारला होता. अमेरिकेतून इंजेक्शन मागविले होते. त्यावरील सहा कोटी रुपयांचे आयात शुल्क केंद्र सरकारने माफ केले होते.
पंधरा जून रोजी वेदिकाला इंजेक्शन दिले होते. तेव्हा पासून तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, रविवारी सायंकाळी खेळत असताना तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. पण, सहाच्या सुमारास तिचे निधन झाले.
सायंकाळी वेदिका खेळत असताना तिला अचानकपणे श्वास घेण्यास त्रास झाला. रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वेदिकावर उपचार करण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी क्राऊड फंडिंगद्वारे १६ कोटी रुपये जमा केले होते. त्यासाठी तिच्या पालकांनी जीवाचे रान केले होते. मात्र वेदिकाचा मृत्यू झाला.
हे ही वाचा:
अल्पवयीन मुलीवर एकाच रात्रीत दोन वेळा सामूहिक बलात्कार
‘कोनशिलेवर मुख्यमंत्र्यांचे नाव, मग छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का नाही?’
अनिल देशमुख यांची पुन्हा हुलकावणी
पूजा चव्हाण प्रकरणात मिळाला मोठा पुरावा! संजय राठोडांच्या अडचणीत वाढ?
जेनेटिक स्पायनल मॅस्कुलर अॅट्रोफी म्हणजेच एसएमए हा आजार शरीरात एसएमएन-१ जीनच्या कमतरतेमुळे होतो. यामुळे छातीचे स्नायू कमकुवत होतात आणि श्वास घेण्यात अडथळा येतो. हा आजार प्रामुख्याने लहान मुलांना होतो आणि त्रास वाढून रुग्णाचा मृत्यू होतो. ब्रिटनमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथे दरवर्षी जवळपास ६० बाळांना जन्मजात हा आजार होतो.