34 C
Mumbai
Friday, November 8, 2024
घरविशेषगॅसमुळे गरम झालेल्या सामान्यांच्या खिशाला किंमत घसरणीचा थंडावा

गॅसमुळे गरम झालेल्या सामान्यांच्या खिशाला किंमत घसरणीचा थंडावा

Google News Follow

Related

आजपासून स्वयंपाकाच्या सिलेंडरचे भाव ₹१० ने घसरले आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्वयंपाकाच्या एलपीजी सिलेंडरचे भाव ₹१०ने घसरल्याने ₹८०९ प्रति सिलेंडरवर स्थिरावले आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने ही माहिती दिली आहे. यापूर्वी सिलेंडरचे भाव ₹८१९ प्रति सिलेंडर होते.

“स्वयंपाकाच्या घरगुती सिलेंडरचे भाव ₹१०ने घटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आधी ₹८१९ प्रति सिलेंडर असलेला दर दिल्लीमध्ये १ एप्रिल पासून प्रति सिलेंडर ₹८०९ करण्यात येईल. हाच नियम इतर बाजारपेठांना देखील लागू होईल.” असे आयओसीकडून सांगण्यात आले असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तावरून समजते.

हे ही वाचा:

“रक्ताचा खेळ यापुढे चालणार नाही”- मोदींचा दीदीला इशारा

पंतप्रधानांनी केली रश्मी ठाकरे यांच्या प्रकृतीची चौकशी

प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारानंतर आता शेतकऱ्यांचा संसदेवर मोर्चा?

नोव्हेंबर २०२० पासून आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचे भाव चढतेच राहिले आहेत. भारत खनिज तेलासाठी मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाचे भाव वाढले की देशांतर्गत तेलावर अवलंबून असलेल्या सगळ्या उत्पादनांचे भाव देखील वाढतात असे, अधिकृत पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.

परंतु गेल्या काही काळात पुन्हा एकदा वाढू लागलेला कोरोनाचा कहर, लसीचे दुष्परिणाम इत्यादी बाबींमुळे तेलाच्या दरात मार्च २०२१ मध्ये थोडी उतरण पहायला मिळाली. आयओसीने दिलेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेल कंपन्यांनी या दोन्ही इंधनांच्या किरकोळ दरात देखील ६१ पैसे आणि ६० पैसे इतकी कपात केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
189,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा