कोव्हिड-१९ ची प्रकरणे काही महिने कमी झाली होती. त्यातच आता नवीन विषाणूने आपले हातपाय पसरवायला सुरुवात केली आहेत. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या नवीन व्हायरसचे नाव H3N2 आहे, जो इन्फ्लूएंझा ए व्हायरसचा एक उपप्रकार आहे. या विषाणूची लागण झाल्यावर रुग्णाला ताप येणे, दम लागणे, कोरडा खोकला, थकवा येणे यांसारखी तापाची लक्षणे दिसून येतात आणि ती तीन आठवड्यापर्यंत राहतात. या व्हायरससंदर्भात सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, H3N2 रोखण्यासाठी देखरेख आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून तो अधिकाधिक पसरू शकणार नाही.
तीन वर्षे कोरोना महामारीचा सामना केल्यानंतर लोकांच्या या व्हायरसबाबत अनेक प्रश्न आहेत. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी देण्यात आलेल्या लसी H3N2 विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी किती प्रभावी आहेत? लोकांनाही याबद्दल जाणून घ्यायचं आहे. याबद्दल डॉक्टरांचे काय म्हणणे आहे हे देखील जाणून घ्या.
कोविड लस H3N2 विषाणूपासून संरक्षण करू शकते?
डॉक्टरांचे यावर असे म्हणणे आहे की, नाही, असे कोविड लस यावर उपाय नाही. कारण कोविड-१९ आणि H3N2 दोन्ही विषाणू एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. कोणत्याही विषाणूची लस त्या विषाणूचे स्वरूप, प्रसाराची वारंवारता इत्यादींच्या आधारे बनवली जाते. कोव्हिड-१९ आणि H3N2 विषाणूंचे स्वरूप भिन्न आहे. म्हणून कोविड लस या इन्फ्लूएंझा विषाणूपासून संरक्षण करण्यास मदत करणार नाही.
सीएसआयआर-सेंटर ऑफ सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी आणि आता बेंगळुरूस्थित टाटा इन्स्टिट्यूट फॉर जेनेटिक्स अँड सोसायटीचे माजी संचालक डायरेक्टर राकेश मिश्रा म्हणतात की, देशात पसरत असलेला विषाणू हा एक सामान्य फ्लू आहे, ज्याचा नवीन प्रकार असल्यामुळे तो बराच काळ टिकून राहतोय. कोव्हिड-१९ विषाणूप्रमाणे तो लवकरच संपेल. परंतु लक्षणे जाणवल्यास चाचणी करून घ्या. त्यासाठी सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष ठेवावे.
हेही वाचा :
पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यामुळे रुग्ण, शाळांना फटका
म्यानमारमध्ये बौद्ध भिक्षुंना घातल्या गोळ्या
काही आमदार परत येतील म्हणूनच १६ आमदारांना नोटीस दिली
राकेश मिश्रा पुढे म्हणतात, इतर कोणत्याही विषाणूप्रमाणे H3N2 विषाणू टाळण्यासाठी योग्य खबरदारी घ्या. संसर्ग टाळण्यासाठी मास्क घाला, हात स्वच्छ ठेवा आणि चेहरा आणि डोळ्यांना वारंवार स्पर्श करणे टाळा. मास्क घालणे, आणि ते गांभीर्याने घेणे थांबवले आहे, परंतु फेस मास्कमुळे फ्लूचा प्रसार रोखता येऊ शकतो. मास्क हानिकारक कणांना शरीरात जाण्यापासून प्रतिबंधित करते, म्हणून मास्क घाला.
H3N2 किती धोकादायक आहे?
गंगाराम हॉस्पिटलचे डॉ. धीरेन गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, H3N2 हे अँटीजेनिक ड्रिफ्ट आणि सौम्य म्युटेशन असले तरी तो जीवघेणा नाही. पण एखाद्या रुग्णाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त आजार असतील तर मृत्यूची शक्यता जास्त असते.
कोणाला जास्त धोका आहे?
डॉ. कुलदीप कुमार ग्रोव्हर यांच्या मते, H3N2 विषाणूचा धोका लहान मुले आणि वृद्धांमध्ये जास्त असतो. कारण तो प्रतिकारशक्तीवर हल्ला करतो. ज्यांना दमा, हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा आणि कमकुवत प्रतिकारशक्ती आहे त्यांनाही जास्त धोका असतो. गरोदर महिलांनाही या विषाणूचा धोका जास्त असतो. कोव्हिडमुळे मुले २ वर्षे घरातच राहिली आणि शाळा आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहिली. पण आता शाळा सुरू झाल्या असून बाजारपेठांमध्येही गर्दी झाली आहे, त्यामुळे या कॉमन व्हेरियंटमुळे मुलांमध्ये या विषाणूच्या वाढत्या रुग्णांची संख्या वाढत आहे.