28 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषकोरोनामुळे नाही उपासमारीने आधी मरू

कोरोनामुळे नाही उपासमारीने आधी मरू

Google News Follow

Related

भिवंडीतील भयाण वास्तव

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असं सरकारनं जाहीर केलं खरं परंतु रेशनवरील हक्काचं धान्यही मिळत नसल्याने लेकरांना काय खाऊ घालायचं, असा प्रश्न शहापूर भागातील कुंडन गावातील गावकऱ्यांना पडला आहे.

शहापूर भागात पहिल्या लॉकडाऊनमध्ये  दारिद्र्य रेषेखालील ८८७ कुटुंबांना पिवळं रेशनकार्ड  देण्यात आलं आणि रेशनही वाटपही करण्यात येत होतें. मात्र आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र या भागातील तब्बल ४५५ कुटुंबांना मागील तीन महिन्यापासून रेशन दिलं जात नाहीये. त्यामुळे येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. कोरोनाने नंतर मात्र भुकेने आधी मरू अशी परिस्थिती येथील गावकर्‍यांची आहे.

गरीबांना उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून रेशन सुरु झाले. अंत्योदय आणि शहरी गरीब यांनाच सध्या रेशनवर धान्य मिळतेय. लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कुटुंबांना कसे धान्य देणार? असा सवाल विचारला जात आहे. शहापुरातील कुंडन गावासह लाहे, जांभुळवाड, जुनवणी, भातसई, मढ, मासवणे, शेरे, साने, बामनपाडा आणि तालुक्यातील ४५५ पेक्षा जास्त रेशनकार्ड धारकांना मागील तीन महिन्यांपासून रेशन न मिळाल्याने परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे.

येथील आदिवासी कातकरी समाजातील नागरिकांना मोलमजुरी करून जेमतेम २०० रुपये मिळतात. तेही पुरत नाहीत. सध्या लॉकडाऊनमुळे कामही मिळत नाही, त्यात पिवळ्या रेशनकार्डवर मिळणारे रेशनही बंद झाल्याने गावकऱ्यांवर उपासमारची वेळ आली आहे. घरात धान्यच नाही तर लेकरं जगणार कशी? सगळेजण घरीच आहेत, लॉकडाऊनमुळे बाहेर जाता येत नाही, सर्व कामधाम बंद असल्याने पैसा नाहीए, घर भागवण्यासाठी कशी व्यवस्था करता येईल सुचत नाही. पिवळं रेशनकार्ड ऑनलाइन न झाल्यानं रेशनकार्ड धारकांना रेशन दिलं जात नसल्यानं या अडचणीच्या काळात धान्य मिळणार नसेल तर उपयोग काय? जर रेशन मिळत नसेल तर लोकांनी काय उपाशीच मरायचं का? असा प्रश्न येथील गावकरी विचारत आहेत.

कुंडन गावातील अनेक घरात दोन वेळच्या जेवणासाठी देखील अन्न नाही. घरात फक्त भात शिजवून त्याची पेज तयार करून मुलांची भूक भागवली जात जात आहे. तर कधी पाणी पिऊन जगत आहेत. घरात पाणी नसल्यास कधी कधी तर सर्वांना उपाशीपोटीच झोपावं लागतं. मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये रेशन दुकानातून पिवळ्या रेशन कार्डवर धान्य मिळाले. मात्र यंदा लॉकडाऊनमध्ये ज्यांचे रेशनकार्ड ऑनलाईन असतील त्यांनाच रेशन मिळणार असल्यानं येथील आदिवासी कातकरी गोरगरिबांचे हाल झाले असून भीक मागण्याची वेळ आली आहे.

टीव्हीवर ज्याप्रमाणे भाषणं केली जातात त्याप्रमाणे पूर्ण का केली जात नाही? बोलण्यापेक्षा सारकरने करून दाखवावं मग टीव्हीवर बोलावं. लॉकडाऊनमध्ये सर्वांची काळजी घेऊ, असं सरकार म्हणतंय. परंतु आमची कोणतीही काळजी घेतली जात नाही आमच्या जीवनात रोज कोरडं अन्न आहे. सरकार असं कोरड अन्न खात का? कुठे आहे हे सरकार? त्यांचं घर माहिती असतं तर त्यांना जाऊन दाखवलं असतं, अशा अनेक प्रकारचे प्रश्न हे ग्रामस्थ सरकारला विचारत आहेत.

हे ही वाचा:

अजितदादांच्या मनात बहुजनांविषयी आकस

महाराष्ट्रात ५९ हजार ३१८ नवे कोरोना रुग्ण

तौक्तेचा तांडव: जळगावमध्ये झाड पडून दोन मुलींचा मृत्यू, आई गंभीर जखमी

तौक्ते वादळाचा कर्नाटक,गोव्याला तडाखा… गुजरात अलर्टवर

गावकऱ्यांच्या मते पिवळं रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी लागणारे कागदपत्र जमा केले होते. मात्र काही लोकांचे रेशन कार्ड ऑनलाइन झाले, तर काही जणांचं ऑनलाइन झाले नाही. त्यामुळे ज्या लोकांचं ऑनलाईन रेशन कार्ड झालं नाही त्यांचं रेशन शासनाच्या वतीने थांबवण्यात आलं आहे. त्यामुळे अशा लोकांना रेशन दिले जात नाहीये. मागील तीन महिन्यात रेशन न मिळाल्याने या लोकांचे खूप हाल झाले आहेत. घरात खायला अन्न नाही त्यामुळे फक्त भात खाऊन किंवा उपाशी राहून जीवन जगत आहेत, मजुरांची स्थिती खुपच हलाखिची झाली आहे. विशेष बाब म्हणून अशा लोकांना धान्याची व्यवस्था सरकारने करुन द्यावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने  केली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा