ऋषिकेश सिनलकर या २९ वर्षीय तरुणाचे कोरोनामुळे निधन झाले आहे. बुधवार, १९ मे रोजी ऋषिकेशचे ठाणे येथे निधन झाले. गेले काही दिवस त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. पण अखेर त्याची ही झुंज अपयशी ठरली.
देशभर सध्या कोरोनाचा उद्रेक सुरू असून त्यात दर दिवशी हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. यात अनेक तरुणांचाही जीव जात आहे. ठाण्यातील ऋषिकेश सिनलकर हा असाच एक तरुण. सुरुवातीपासूनच ऋषिकेश सामाजिक कार्यात अतिशय सक्रीय होता कोरोनामुळे जिथे सारे जग थांबून घरात बसले होते, तिथे दुसरीकडे काही लोक समाजात उतरून काम करत होते. त्यातील ऋषिकेश एक होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संस्कारात ऋषिकेशची जडणघडण झाली होती. समाजकार्यासाठी तो कायमच तत्पर असायचा. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऋषिकेश हा कोरोनायोद्धा म्हणून कार्यरत होता. टेस्टिंग आणि स्क्रिनिंगच्या प्रक्रियेत तो प्रशासनाला मदत करत होता. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्याला कोरोनाने ग्रासले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
हे ही वाचा:
मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, रासायनिक खतांच्या सबसिडीत १४०% वाढ
मच्छीमारांच्या आक्रोशासमोर पालकमंत्र्यांची बोलती बंद
ठाकरे सरकारने निसर्ग चक्रीवादळाची नुकसान भरपाई अजून दिलेली नाही
मुख्यमंत्र्यांनी निदान मुंबईचा तरी दौरा करावा
तरुण ऋषिकेशच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला असून त्याच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे ऋषिकेश च्या जाण्याने समाजाचे खूप मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.