27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषमहाराष्ट्रातील मृत्यूदराने टाकले जर्मनी स्पेनलाही मागे

महाराष्ट्रातील मृत्यूदराने टाकले जर्मनी स्पेनलाही मागे

Google News Follow

Related

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्येही वेगाने मृत्यूदर वाढत आहे. महाराष्ट्रातील आत्तापर्यंत एकूण मृत्यूचा आकडा हा आता ९० हजारांच्या पुढे गेलेला आहे. मंगळवारी ६०१ जणांचा मृत्यू झाला; एका आठवड्यानंतर आणखी ५३६ जणांची भर पडली आणि त्यात एकूण मृत्यू ९०३४९ वर गेले. गेल्या दहा दिवसांमध्ये राज्य सरकारच्या नोंदीनुसार कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या १० हजार आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर हा चढाच असल्याचे दिसून आले आहे.

एकूणच काय तर महाराष्ट्रातील मृत्यूदराने आता जर्मनी आणि स्पेनसारख्या देशांनाही मागे टाकले आहे. दरम्यान, सलग सहाव्या दिवशी दररोजची भर ३०,००० पेक्षा कमी राहिली आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांचा नौटंकी दौरा

मुंबईला अनलॉकसाठी दीर्घकाळ करावी लागणार प्रतीक्षा

व्यापाऱ्यांच्या संयमाचा कडेलोट; १ जूनपासून शटर उघडणारच

डॉ. जयंत नारळीकर उलगडणार ‘सावरकरांची विज्ञाननिष्ठा’

मार्च २०२० पासून मुंबई कोविड-१९ च्या आजाराची सुरुवात झाली. साथीच्या या आजाराने सरकारचे पुरते कंबरडे मोडले. एकूणच ढिसाळ व्यवस्था आणि प्रशासनाचा गैरकारभार यामुळे अनेकांना बेड मिळणेही मुश्कील झाले होते. मंगळवारी शहरात १०२९ घटनांची भर पडली असून ही संख्या ६.९ लाखांवर पोचली आहे.

“दररोज करण्यात येणारा कोरोना चाचणीमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहीती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून शहरातील रुग्णवाढीचे सरासरी प्रमाण कमी आल्याचेही त्यांनी सांगितले.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटले आहे की १५ दिवसांमध्ये चाचणी करुन पॉझिटिव्हिटी ५ टक्के येत असेल तरच निर्बंध उठायला हवेत. अन्यथा निर्बंध तसेच लागू करावेत. माहिमच्या हिंदुजा हॉस्पिटलचे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. लान्सलॉट पिंटो म्हणाले की, शहरातील एकंदरीत कोविडची परिस्थिती एक महिन्यापूर्वीपेक्षा चांगली आहे.

“नियमित इस्पितळातील बेड सहज उपलब्ध असतात पण आयसीयू अजूनही खूप व्यस्त असतात. मृत्यूदर कमी होण्यास अजून काही आठवडे लागतील असे त्यांनी नमूद केले.

राज्य स्तरावर महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगर सारख्या अनेक छोट्या जिल्ह्यांमध्ये मृत्यूदर हा वाढत आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये सुद्धा मृत्यूची भर पडत आहे. उच्च मृत्यू दर हे राज्यापुढील आव्हान आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांमध्ये मात्र सातत्याने घट होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा