कोरोना संयमाची परीक्षा घेत आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोना संयमाची परीक्षा घेत आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशावासियांशी मन की बातमधून संवाद साधला. देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटावर त्यांनी भाष्य केलं. कोरोना संयमाची परीक्षा घेत आहे. आपले अनेक सहकारी, नातेवाईक आपल्याला सोडून गेले आहेत. हा धैर्य आणि संयमाचा क्षण आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून देशवासियांना धीर देण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या विरोधातील लढाई मजबुतीने सुरू आहे. सर्व सेक्टरच्या लोकांनी सल्ले दिले आहेत. राज्य सरकारही आपल्या पातळीवर काम करत आहे, असं ते म्हणाले. कोरोना काळात केवळ तज्ज्ञांचा सल्ला घ्या. फॅमिली डॉक्टर्स किंवा तुमच्या जवळपासच्या डॉक्टर्सचा सल्ला घ्या. कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यासाठी तज्ज्ञ आणि संशोधकांच्या सल्ल्यांची गरज आहे. राज्य सरकारांकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या डॉ.शशांक जोशी यांच्याशी संवाद साधला. आपल्याकडे जगातले सर्वात उत्कृष्ट उपचार उपलब्ध आहेत आपण पाहू शकता की, भारतात रूग्ण बरे होण्याचा दर सर्वात चांगला आहे. आपण युरोप किंवा अमेरिकेशी तुलना केली तर आमच्याकड़े रूग्ण उपचारांच्या नियमावलीनुसार बरे होत आहेत, असं डॉ शशांक जोशी म्हणाले.

हे ही वाचा:

कोविशील्डनंतर कोवॅक्सीनचीही किंमत जाहीर

कठीण समय येता रशिया कामास येतो?

रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्याला अटक

धर्मांतरासाठी ५०,००० रुपयांची लालूच, नकार दिल्यावर मारहाण

केंद्र सरकार सर्व राज्यांना मोफत कोरोना लसी पाठवत आहे. कोणत्याही नागरिकानं कोरोना लसीबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.

Exit mobile version