मुंबईतील कोरोनाने ओलांडला २०० रुग्णांचा टप्पा

मार्चमध्ये तापमानात सातत्याने होत असलेल्या चढ-उतारामुळे या विषाणूला झपाट्याने वाढण्याची संधी मिळाली आहे.

मुंबईतील कोरोनाने ओलांडला २०० रुग्णांचा टप्पा

New Delhi, Aug 07 (ANI): A health worker in personal protective equipment (PPE) collects a sample using a swab from a girl at a local health centre to conduct tests for the coronavirus disease (COVID-19), amid the spread of the disease at Ajmeri Gate area, in Delhi on Friday. (ANI Photo)

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईतील कोरोना रुग्णांनी २०० चा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत २१ मार्च रोजी कोरोनाचे ६१ रुग्ण नोंदवण्यात आले होते. चार एप्रिल रोजी रुग्णांची संख्या २१८ वर पोहोचली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मुंबईतील रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली. सोमवार ३ एप्रिलपर्यंत एप्रिलपर्यंत दररोज सक्रिय होणाऱ्या रुंगांची संख्या २०० पेक्षा कमी होती. मात्र मंगळवारी एकाच दिवसात २०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या १५ दिवसांत मुंबईत १,८८६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये तापमानात सातत्याने होत असलेल्या चढ-उतारामुळे या विषाणूला झपाट्याने वाढण्याची संधी मिळाली आहे. त्याचवेळी, कोरोनासह इतर आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने रुग्णांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. हवामानातील बदलामुळे बहुतांश नागरिकांना सर्दी, खोकला, तापाचा त्रास होत आहे. कोरोनाची लक्षणेही तशीच आहेत. रुग्णांची लवकर ओळख होण्यासाठी मुंबई महानगपालिकेने आता चाचणीवर भर देण्याच्या धोरणावर काम सुरू केले आहे.

या आजाराला बळी पडणारे बहुतेक लोक उच्च जोखमीच्या श्रेणीतील आहेत. यामध्ये वृद्ध, कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक आणि गर्भवती महिलांचा समावेश असल्याचे मुंबई महानगर पालिकेने म्हटले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने रुग्णांची लवकर ओळख करून वेळेवर उपचार सुरू करण्याच्या योजनेवर काम सुरू केले आहे. रुग्णांची ओळख पटवून रोगाचा प्रसार रोखता येतो.

हे ही वाचा:

ईडी, सीबीआयचा गैरवापर होत असल्याची विरोधकांची याचिका न्यायालयाने ठरविली ‘फडतूस’

मनीष सिसोदियांचा १७ एप्रिलपर्यंत मुक्काम तुरुंगातच

भेगा असल्या तरी गेटवे ऑफ इंडिया सुस्थितीत

रॅप गाण्यातून मुख्यमंत्र्यांवर बदनामीकारक शब्दप्रयोग करणाऱ्यावर गुन्हा

राज्य आरोग्य बुलेटिनच्या आकडेवारीनुसार मुंबईत एकूण १,१६२ सक्रिय प्रकरणे नोंद झाली आहेत, त्यानंतर पुण्यात ७८१, ठाण्यात ६७० आणि नागपूरमध्ये १२७ प्रकरणे आहेत. महाराष्ट्रात मंगळवारी एकूण चार कोविड-संबंधित मृत्यूची नोंद झाली, मृत्यू दर सध्या १.८२ टक्के आहे.

चाचणी करून घेण्याचा सल्ला

ज्या रुग्णांना ताप येत आहे आणि ज्यांचा ताप ४८ तासांपेक्षा कमी होत नाही, अशा रुग्णांना कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अति जोखीम श्रेणीतील नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि मास्कचा वापर टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही हळूहळू वाढत आहे.

Exit mobile version