आयपीएलमध्ये शिरला करोना

आयपीएलमध्ये शिरला करोना

खेळाडू, कर्मचारी ठरले पॉझिटिव्ह; सामना स्थगित

बायोबबलचे सुरक्षित कवच असतानाही इंडियन प्रीमियर लीगमध्ये करोनाने प्रवेश केला आहे. खेळाडू, कर्मचाऱ्यांना करोनाने ग्रासले असून अहमदाबाद येथील कोलकाता-बेंगळुरू लढतही स्थगित करण्यात आली. करोनाच्या या संसर्गाच्या फटक्यामुळे आयपीएलच्या आगामी लढतींचे काय होणार, त्या लढती होणार की, बीसीसीआय आयपीएलसंदर्भात काही वेगळा निर्णय घेणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.

हे ही वाचा:

नागपूरच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांची लूट

लॉकडाउनच्या काळात नवे स्पुतनिक स्कॅम

कुबड्यांवर चालणाऱ्यांची पश्चिम बंगालबाबत बोलण्याची औकात काय?

भारतातील पेटत्या चिता पाहून चीनला उकळ्या

करोनाच्या वाढत्या संसर्गातही दिमाखात सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगला अखेर करोनाचे गालबोट लागले आहे.
कोलकाता संघाचे वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना करोनाची लागण झाल्यामुळे आयपीएलला मोठा धक्का बसला. त्यामुळे सोमवारी होणारा कोलकाता-बेंगळुरू यांच्यातील आयपीएल सामना स्थगित करण्यात आला आहे. हा सामना नंतर खेळविला जाणार आहे. वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांचा गेल्या चार दिवसांतील तिसऱ्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संघातील बाकी सर्व सदस्यांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. चेन्नईच्या संघातही या करोनाचा फटका बसला आहे. चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक एल. बालाजी आणि स्टाफमधील एका जणाच्या करोना चाचणीचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला होता. पुन्हा चाचणी करण्यात आली तेव्हा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. रविवारी आलेला अहवाल चुकीचा होता, असे बीसीसीआयच्या सू्त्रांकडून सांगण्यात आले.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममधील काही मैदान कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांच्या करोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे प्रमुख रोहन जेटली यांनी यापैकी एकही कर्मचारी कामावर नसल्याचे स्पष्ट केले आहे.
. कोलकाताचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने या सर्व घडामोडींची माहिती सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंना दिली आहे.

Exit mobile version