28 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषमहाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू

महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू

Google News Follow

Related

कोरोना महामारीची दुसरी लाट महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी खूप घातक ठरलेली आहे. महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत त्यापैकी ११ जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रातील संख्या अधिक आहे. एकट्या चंद्रपूरमध्ये गेल्या वर्षी २३ हजार २४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यंदा मात्र मृतांच्या संख्येत तीनपटीने अधिक वाढ झालेली आहे. यंदा मृतांची संख्या ६१ हजार ३९० इतकी झालेली आहे.

अमरावतीमध्ये दुसरी लाट सर्वप्रथम निदर्शनास आली. दुसरी लाट आली असता सर्वाधिक रुग्ण हे अमरावतीमध्ये सापडले. दुसरी लाट आल्यानंतर अमरावतीमध्ये जवळपास हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याचबरोबरीने सिंधुदुर्ग, वाशिम, गोंदिया, वर्धा, नांदेड, हिंगोली, परभणी अशा इतर जिल्ह्यांमध्ये मृत्यूची संख्या वाढत आहे.

हे ही वाचा:

चोक्सी सापडला; आता भारताच्या स्वाधीन करणार?

जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा

मराठा आरक्षणावर दहा मिनिटांत सकारात्मक चर्चा?

काँग्रेसचे ‘सेक्युलॅरिझम’: मंदिरांचे स्पीकर हटवले, मशिदींवरील भोंगे जैसे थे

केएमई रुग्णालयाचे माजी डीन डॉ. अविनाश सुपे म्हणाले, मृत्यू दर वाढतोय हे खरे आहे, काही जिल्ह्यांना मृत्यूदराचा मोठा फटका बसला आहे. “अमरावतीसारख्या बर्‍याच जिल्ह्यांमध्ये दोन लाटा लागोपाठ दिसून आल्या. तसेच तिथे मृत्यूचे प्रमाणही वाढले. अनेक जिल्हे कोरोनामुळे ग्रासले असून, आजही तिथला मृत्यूदर हा चढाच असल्याचे ते म्हणाले.

बीएमसीच्या एका वरिष्ठ डॉक्टरने म्हटले, कोरोना विषाणूवर अद्यापही कुठले ठोस औषध प्राप्त नसल्यामुळे राज्याने जपून राहायला हवे. दुसर्‍या लाटेत राज्याचा मृत्यूदर हा चढा आहे. अधिक बोलताना ते म्हणाले, “मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर या मोठ्या शहरांमधील मृत्यूच्या घटनेमुळे राज्य सीएफआर खाली घसरला आहे. परंतु छोट्या व दुर्लक्षित जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. तिथे अजून व्हावी तितकी जनजागृती कोरोना संदर्भात झाली नसल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये मृत्यूदरामध्ये वाढ होत राहिली. गडचिरोलीच्या एका अधिकार्याने सांगितले की, शहरांमधील वैद्यकीय साधनसामग्री तसेच मदत अजूनही उर्वरित भागात हव्या त्याच प्रमाणात पोहोचत नाही. त्यामुळे आता तिसरी लाट येण्याच्या मार्गावर असताना केवळ सावध राहणे हाच एक उपाय असल्याचे डॉ.बंग यांचे म्हणणे आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा