जागतिक महामारी कोरोनाने वृद्धांसह लहान मुलांनाचाही बळी घेतला आहे. कोरोना संसर्गाच्या काळात महाराष्ट्रात सात महिन्यांत पाच वर्षांखालील मुलांचा आठ हजाराहून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्र विधानसभेत ही माहिती दिली आहे.
राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२१ या सात महिन्यांच्या काळात महाराष्ट्रातील ८ हजार ५८४ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नागपुरातील सर्वाधिक लहान मुलांचा समावेश आहे. नागपुरात ९२३ बालकांचा मृत्यू झाला आहे. मुंबई शहरात ७९२, औरंगाबादमध्ये ५८७, पुण्यात ४२२ आणि नाशिकमध्ये ४१७ बालकांचा मृत्यू झाला आहे.
टोपे म्हणाले की, कोरोनाच्या काळात आरोग्य सेवा सुधारण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांच्या शिफारशींनुसार सरकारने महिला आणि मुलांसाठी अनेक योजना राबवल्या. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, संजय केळकर यांनी कोरोनाच्या काळात बालकांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
हे ही वाचा:
मुंबई पोलिसांनी पारदर्शक भूमिका घेतली असती तर…
आसाम मधील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार काश्मीर फाईल्स पाहण्यासाठी अर्ध्या दिवसांची सुट्टी
‘काश्मीर फाइल्स’चे तिकीट दाखवून पुण्यातील हॉटेलमध्ये जेवले १९०० ग्राहक
नवाब मलिकांना दणका; ईडी फराझ मलिकला तिसरं समन्स पाठवणार
दरम्यान, कोरोनच्या तिसऱ्या लाटेचा जास्त परिणाम लहान मुलांवर झाला आहे. पहिल्या दोन लाटांमध्ये लहान मुले सर्वात कमी प्रभावित गटांमध्ये होती. कोरोनाची तिसरी लाट म्हणजे ओमिक्रॉन प्रकार आहे असे मानले जात आहे. आज महाराष्ट्रात १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु झाले आहे. राज्याचे १२ ते १४ या वयोगटातील सुमारे 39 लाख लाभार्थ्यांना कव्हर करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. या गटातील मुलांना कॉर्बेव्हॅक्स लस देण्याची सूचना केंद्र सरकारने दिली आहे.