बुधवारी राज्यात कोरोनाचे नवीन ५८९५२ रूग्ण आढळून आले. तर ३९६२४ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या सोबतच राज्यातल्या रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८१.२१% इतके आहे. सध्या राज्यातील सक्रिय रूग्णांची संख्या ६,१२,०२० इतकी आहे.
राजधानी मुंबईतही बुधवारी कोरोना रूग्णसंख्येचा उद्रेक पहायला मिळाला. मुंबईत ९९२५ नवे रूग्ण नोंदवण्यात आले आणि ९२७३ रूग्ण कोरोनामुक्त झाले. यासोबतच मुंबईतील सक्रीय रूग्णांची संख्या ८७४४३ झाली आहे. तर आज दिवसभरात मुंबई ५४ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.
राज्यातल्या याच परिस्थितीचा विचार करता राज्यात १४ एप्रिलच्या रात्रीपासून लॉकडाऊनला सुरवात झाली आहे. पुढील पंधरा दिवस राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कारभार हा बंद राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून यासंबंधीची घोषणा केली.
ही वाचा:
कडक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू
रेमडेसिवीरबाबत नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय
ठाणे महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमधूनच ‘रेमडेसिवीर’ काळ्या बाजारात?
‘रेमडेसिवीर’ काळा बाजाराचा मालवणी पॅटर्न
राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पुढील १५ दिवस राज्यात संचारबंदी आदेश लागू असतील. अनावश्यक कारणांसाठी नागरिकांचे बाहेर फिरणे पूर्णपणे बंद असणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होणार नाही. त्या अत्यावश्यक कामांसाठीच वापरल्या जातील. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांच्या प्रवासासाठी त्या सुरु ठेवण्यात येतील. त्यामध्ये रुग्णालय, वैद्यकीय सेवा, वाहतूक सप्लाय चेन, लस उत्पादक आणि वाहतूक करणारे, मास्क, जंतूनाशक उत्पादक आणि वितरक, वैद्यकीय कच्चा माल निर्मिती करणारे कर्मचारी, जनावरांचे दवाखान्यातील कर्मचारी, शितगृहे, वेअर हाऊसिंग, बस, ऑटो, विविध देशांची राजनैतिक कार्यालये, पावसाळी कामे सुरु राहतील, सर्व बँका, सेबी, सेबीने मान्यता दिलेली कार्यालये, दूरसंचार सेवा, ई-कॉमर्स, अधिस्विकृतीधारक पत्रकार, पेट्रोल पंप सुरु राहतील, शासकीय आणि खासगी सुरक्षा मंडळे, आयटी सेवा सुरु राहतील.