कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट

कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ६० हजार ७५३ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर उपचार घेत असलेल्या १,६४७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. काल दिवसभरात देशातील एकूण ९१ हजार ७४३ कोरोना रुग्ण बरे होऊ घरी परतले. बुधवारी दिवसभरात देशात कोरोनाचे ६२ हजार ४८० कोरोना रुग्ण सापडले होते. या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली घट ही समाधानाची बाब मानली जात आहे.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २,९८,२३,५४६ वर गेला आहे. देशात २ कोटी ८६ लाख ७८ हजार ३९० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ८५ हजार १३७ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर ७ लाख ६० हजार ०१९ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २७,२३,८८,७८३ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

हे ही वाचा:

१२ ते १८ वयोगटातील मुलांसाठीही लवकरच लस येणार?

मुंबईत निर्बंध शिथील करा, व्यापाऱ्यांची ठाकरे सरकारकडे मागणी

पुण्यात पुन्हा विकेंड लॉकडाऊन

महापालिकेचे खासगीकरण होतेय का?

देशात २४ तासात नवे रुग्ण – ६०,७५३

देशात २४ तासात डिस्चार्ज – ९७,७४३

देशात २४ तासात मृत्यू – १,६४७

एकूण रूग्ण – २,९८,२३,५४६

एकूण डिस्चार्ज – २,८६,७८,३९०

एकूण मृत्यू – ३,८५,१३७

एकूण सक्रिय रुग्ण – ७,६०,०१९

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – २७,२३,८८,७८३

Exit mobile version