महाराष्ट्र राज्य कोरोनातून सावरत आहे असे वाटत असतानाच पुन्हा एकदा राज्यात कोरोना रुग्णवाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील काही शहरांत अंशतः लॉकडाऊन देखील करावे लागले आहे. मुंबईत देखील गेल्या चोविस तासात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ नोंदली गेली आहे. त्यामुळे काही प्रमाणात निर्बंध देखील लादण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
मागील वर्षापासून राज्याने कोरोनाचा सामना केला आहे. मास्क वापरणे, गर्दी टाळणे इत्यादी नियम पाळल्यानंतर डिसेंबर पासून रूग्ण संख्येत घट व्हायला सुरूवात झाली होती. मात्र गेले काही आठवडे सातत्याने रुग्णवाढ होताना दिसत आहे. मुंबई, नागपूर, धुळे, औरंगाबाद, अमरावती इत्यादी शहरे कोविड हॉटस्पॉट बनत आहेत.
या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लग्न समारंभ, राजकीय सभा, व्यायमशाळा, जिम इत्यादी बंद ठेवण्यात आले आहे. त्याबरोबरच निष्कारण बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
गेल्या चोविस तासात राज्यात सुमारे १३,६५९ नवे रुग्ण आढळले होते, तर बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या जवळपास ९ हजारांच्या घरात आहे. राज्यात सद्य स्थितीत सुमारे ९९,००८ ऍक्टिव्ह केसेस आहेत. त्यामुळे सरकारकडून सातत्याने मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे, गर्दीची ठिकाणे टाळणे इत्यादी खबरदारीचे उपाय पाळण्याची सुचना करण्यात येत आहे.