कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी आणखी दोन लसींना मान्यता

कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी आणखी दोन लसींना मान्यता

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रौढांसाठी आणखी दोन कोरोना प्रतिबंधित लसींना मान्यता दिली आहे. कॉर्बेव्हॅक्स (Corbevax), कोवोव्हॅक्स (Covovax) आणि अँटी-व्हायरल गोळी (Molnupiravir) याला मान्यता दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी याबद्दल ट्विट केले आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशने (CDSCO) एकाच दिवशी कॉर्बेव्हॅक्स, कोवोव्हॅक्स आणि मोलनूपिराविर याला मान्यता दिली आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरण्यासाठी मान्यता आहे. कॉर्बेव्हॅक्स लस ही भारतातील पहिली स्वदेशी विकसित RBD प्रोटीन सब- युनिट लस असून हैदराबादमधील बायोलॉजिकल- ई कंपनीने बनवली आहे, असे मांडविया म्हणाले.

कोवोव्हॅक्स ही पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बनवली आहे. अँटी-व्हायरल मोलनूपिराविर ची आता भारतात १३ कंपन्यांमध्ये निर्मिती होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत या औषधांचा वापर करता येणार आहे.

हे ही वाचा:

सौरव गांगुलीला कोरोनाची लागण

लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाईंडला अटक

दिव्यांग रिक्षाचालकाला आनंद महिंद्रा यांनी दिली ‘ही’ ऑफर

रायगड: महिला सरपंचाचा खून! विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

मनसुख मांडविया यांनी भारताच्या फार्मा उद्योग क्षेत्राचे कौतुक केले आहे. या मंजुरींमुळे साथीच्या रोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला आणखी बळ मिळणार आहे आणि आपला फार्मा उद्योग हा संपूर्ण जगासाठी एक संपत्ती आहे, असे मांडविया म्हणाले.

Exit mobile version