26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषगणेशविसर्जनादरम्यान गणवेश घालून नाचलेल्या पोलिसांना खडसावले

गणेशविसर्जनादरम्यान गणवेश घालून नाचलेल्या पोलिसांना खडसावले

अतिरिक्त पाेलिस महासंचालकांचा अधिकाऱ्यांना इशारा

Google News Follow

Related

गणेशाेत्सवात विसर्जनाच्यावेळी ढाेल ताशाच्या तालावर नृत्य करणाऱ्या पाेलिसांचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला हाेता. या पाेलिसांना नाचताना बघून अनेकांनी आनंदही व्यक्त केला हाेता. परंतु हे नाचणे पाेलिस कर्मचाऱ्यांना महागात पडलेले दिसत आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक कुलवंत सरंगल यांनी पोलिसांना गणवेशात नाचू नका, असा इशारा दिला आहे, या कृतीला त्यांनी ‘अनादर’ असही म्हटलं आहे.

गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्रभरातील पोलिसांच्या ५० पेक्षा जास्त क्लिप सोशल मीडियावर समोर आल्या आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये माटुंगा येथील जीएसबी सेवा मंडळात महिलांसह डझनभर खाकी कपडे घातलेले अधिकारी नाचताना दिसल्यानंतर मुंबई पोलिसांच्या डीसीपी झोन ४ यांनी विभागीय चौकशी सुरू केली असल्याचं म्हटल्या जात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओंपैकी एक म्हणजे दोन पोलिस लालबाग येथे उत्सव करणाऱ्यांच्या खांद्यावर बसलेले दिसतात आणि दुसऱ्यामध्ये ५० पेक्षा जास्त पाेलिस कोल्हापूर पोलिस बंदोबस्तावर असलेल्या ट्रॅकवर जोरदार ठेका धरून नाचत असल्याचे दिसत आहे. “पोलिस अधिकाऱ्यांनी गणवेशात नाचू नये आणि त्यांना तसे करण्याची परवानगी नाही. या प्रकरणाची राज्यभर विभागीय चौकशी सुरू आहे.गणवेशात नाचणे अनादर करणारे आणि अस्वीकार्य असल्याचं एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं.

हे ही वाचा:

मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून ९ ठार

मुंबईत सकाळपासून दमदार, जोरदार

‘प्रिन्स चार्ल्स पायउतार होतील’ कोण म्हणतंय असं

कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना ईडीकडून समन्स

“गेल्या दोन वर्षांपासून, कोविड-१९ मुळे देशभरात कोणीही सण साजरा केला नाही, परंतु यावर्षी सर्व सण थाटामाटात साजरे करण्यात आले. शेवटच्या दिवशी विसर्जनाच्या काही वेळापूर्वी आमच्या मंडळात ढोल-ताशा उत्सव झाला.  शेवटच्या दिवशी विसर्जनाच्या काही वेळापूर्वी आमच्या मंडळात ढोल-ताशा उत्सव झाला. तेव्हा आमच्या स्वयंसेवकांनी गेल्या पाच दिवसांपासून ड्युटीवर असलेल्या सर्व पोलिसांना त्यांच्यासोबत नाचण्याची विनंती केली. ही पोलिसांची चूक नव्हती आणि यात काहीही चूक नाही. ते रस्त्यावर नाचत नव्हते. गणपती मंडळाच्या आत घडली असल्याने सौम्यता दाखवली पाहिजे असं मत जीएसबी सेवा मंडळाचे प्रवक्ते विजय कामथ यांनी व्यक्त केलं आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, मंडळाने सीपी आणि डीसीपी यांना पत्र लिहून पाेलिसांनी विसर्जन काळात उत्तम काम केले असल्याने त्यांच्यावर कारवाई करू नये असं सांगितलं हाेते. तेही माणूस आहेत आणि आमच्यासोबत पाच मिनिटे नाचणे हा गुन्हा नाही असही कामथ यांनी म्हटलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा