जालन्यात युवकाला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे अखेर निलंबन झाले आहे. शुक्रवार, २८ मे रोजी या पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. निलंबन झालेल्यांमध्ये पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम आणि अन्य चार जणांचा समावेश आहे. भारतीय जनता पार्टीचा युवा कार्यकर्ता शिवराज नारियलवाला ज्याला करण्यात आलेली मारहाण या पोलिसांना भोवली आहे.
जालन्यात पोलिसांनी तरुणाला केलेल्या मारहाणीचा व्हीडिओ २७ मे रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हीडिओमध्ये पोलीस एका युवकाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. नातेवाईकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे रुग्णालयाची तोडफोड केल्यामुळे युवकाला पोलिसांनी चोप दिल्याचा दावा केला जात आहे. हा तरुण भाजपा कार्यकर्ता शिवराज नारियलवाला असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालच्या मदतीसाठी धावलेल्या पंतप्रधानांचा ममता दीदींकडून अपमान
बॉलीवूडला पडली वीर सावरकरांची भुरळ, लवकरच येणार बायोपिक
‘मोदी सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी भारतात राजकीय कुरघोडी’
पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांची बदली
एप्रिल महिन्यात दर्शन देवावले या तरुणाचा अपघात झाला होता. त्याला जालना शहरातील दीपक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचारा दरम्यान दर्शन देवावले याचा मृत्यू झाला. दर्शनच्या मृत्यूनंतर संतापलेल्या नातेवाईकांनी दीपक हॉस्पिटलमधील आयसीयू वॉर्डची तोडफोड केली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत शिवाजी नारियलवाले याला अमानुषपणे मारहाण केली होती.
दोन दिवसांपूर्वी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून पोलिसांच्या या मारहाणीवर चौफेर टीका होत होती. पोलिसांवर कारवाई करावी ही मागणी जोर धरू लागली होती. अखेर शुक्रवारी या पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजपा नेते, माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
Police Officer Bhagwat & 4 Constable are now suspended for horrible beating of BJP Jalna Youth Secretary Shivraj Nariyalwale
जालना भाजप चे शिवराज नरियावाले यांना मारहाण प्रकरणी आत्ता पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम व अन्य चौघे यांना निलंबित करण्यात आले आहे @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 28, 2021