पावसाळ्यात पूराचा धोका टाळण्यासाठी यंत्रणांनी समन्वय साधा

महापालिका आयुक्तांचे आवाहन

पावसाळ्यात पूराचा धोका टाळण्यासाठी यंत्रणांनी समन्वय साधा

पर्यावरणीय बदलांमुळे प्रत्येक ऋतूवर परिणाम दिसून येत असून मुंबईतील विविध यंत्रणांनी पावसाळ्याच्या काळात पूरस्थितीच्या आव्हानावर मात करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले आहे. तसेच मुंबईसारख्या मेगासिटीमध्ये पूराचा धोका टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी यंदा पावसाळापूर्व कामांमध्ये चोख भूमिका बजावावी, अशा सूचनाही यंत्रणांना केल्या आहेत.

महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेत मंगळवारी सर्व यंत्रणांची मान्सून पूर्व कामांबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी सर्व यंत्रणांनी पावसाळ्यातील पूराच्या आव्हानासाठी सज्ज रहावे, एकमेकांशी समन्वय साधावा असे निर्देश त्यांनी दिले.

उपनगरीय लोकलसेवा अव्याहतपणे सुरू रहावी, याची काळजी घ्यावी. रेल्वे आणि महानगरपालिकेने गतवर्षीच्या पावसाळ्यात अतिशय उत्तम समन्वय साधून काम केल्यानेच उपनगरीय लोकल सेवा अव्याहतपणे सुरू होती. रेल्वे हद्दीमध्ये मायक्रो टनेलिंग आणि कलव्हर्टच्या सफाईची कामे चांगली झाल्यानेच हे शक्य झाले. तसेच पावसाच्या पाण्याचा संथ गतीने निचरा होणाऱ्या ठिकाणी भूमीगत जल- साठवण टाक्यांची उभारणी केली. त्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक थांबली नाही. यंदाही त्याच धर्तीवर उत्तम समन्वयाने काम करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. रेल्वे परिसरातील वृक्ष छाटणी मोहीम मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी उद्यान विभागाला दिल्या.

नागरिकांना हवामान माहितीचे एसएमएस मिळणार

आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून यंदाच्या पावसाळ्याच्या कालावधीसाठी नियंत्रण कक्ष तसेच हवामानाचे

वेळोवेळी अलर्ट देणारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत वेळोवेळी अपडेट्स देणारी मेसेजची यंत्रणा यंदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

वज्रमुठ सुटली? नाना पटोले यांचा स्बबळाचा नारा

‘गोल्फादेवी’चा जयजयकार, समर्थ स्पोर्टसही विजेते

काँग्रेसमुळे कर्नाटकच्या डोक्यावर ६२ हजार कोटींचा ‘फुकट’चा भार वाढणार

सीबीआयने बेनामी संपत्तीवाल्यांच्या आणले नाकी ‘नऊ’

एनडीआरएफ, भारतीय नौदल सज्ज राहणार

मुंबईत आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्यासाठी एनडीआरएफचे तीन चमू सज्ज असणार आहेत. भारतीय नौदलालाही त्यांच्या चमू आणि पाणबुडे (डायव्हर्स) यासह सुसज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version