नोटांवर झोपलेल्या आसामच्या राजकीय नेत्याच्या छायाचित्रावरून वाद

नोटांवर झोपलेल्या आसामच्या राजकीय नेत्याच्या छायाचित्रावरून वाद

आसामचे नेते बेंजामिन बासुमातारि हे गादीवर झोपले असून त्यांच्याभोवती नोटा विखुरलेल्या असल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. बासुमातारि हे युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (यूपीपीएल) या पक्षाचे निलंबित नेते आहेत. हा पक्ष आसामच्या सत्ताधारी भाजपचा सहकारी आहे.

बासुमातारि हे गादीवर झोपले असून ५०० रुपयांच्या नोटा त्यांच्या आसपास विखुरलेल्या असल्याचे या छायाचित्रात दिसून येत आहे. अर्थात हे छायाचित्र खरे आहे बनावट, याची खात्री होऊ शकली नाही. हे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. स्वतः यूपीपीएल पक्षाने स्पष्टीकरण देऊन बासुमातारि यांच्यापासून आपले हात झटकले.

बासुमातारि यांचा पक्षाशी कोणताही संबंध नसून त्यांना १० जानेवारी, २०२४ रोजीच पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल पक्षाचे अध्यक्ष प्रमोद बोरो यांनी स्पष्ट केले. ‘५जानेवारी, २०२४ रोजी यूपीपीएलच्या हरिसिंग ब्लॉक समितीकडून बासूमातारि यांच्याविरोधातील पत्र मिळाल्यानंतर त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई करण्यात आली,’ असे त्यांनी स्पष्ट केले. बोडोलँड टेरिटोरिअल कौन्सिल यांनी १० फेब्रुवारी, २०२४ रोजी बासुमातारि यांना व्हीसीडीसीच्या अध्यक्षपदावरून निलंबित केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

‘निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत’

२८ वर्षे जुन्या खटल्यात आयपीएस अधिकारी संजीव भट्ट दोषी

संदेशखालीतील महिला म्हणजे ‘शक्तीस्वरूप’

“खिचडी चोराचं काम करणार नाही”

तसेच, हे छायाचित्र पाच वर्षांपूर्वीचे आहे. बासुमातारि हे त्यांच्या मित्रांसोबत पार्टी करत असताना हे छायाचित्र काढण्यात आले होते, असेही स्पष्टीकरण पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे. बासुमातारि यांना हे छायाचित्र दाखवून धमकावण्यात आले होते, मात्र छायाचित्रात दाखवण्यात आलेली रोकड ही बासुमातारि यांच्या बहिणीची आहे, असेही सांगण्यात आले. ‘बासुमातारि यांच्याकडून होणाऱ्या कोणत्याही कृतीला ते स्वतः जबाबदार आहेत. पक्षाला त्यांच्या कोणत्याही वैयक्तिक कारवायांशी देणेघेणे नाही,’ असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version