आतिशी यांनी रिकामी ठेवली केजरीवालांची खुर्ची, भाजपाकडून टोमणा!

भाजप खासदार मनोज तिवारींनी उठवला सवाल

आतिशी यांनी रिकामी ठेवली केजरीवालांची खुर्ची, भाजपाकडून टोमणा!

दिल्लीचे नवे मुख्यमंत्री आतिशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ‘मुख्यमंत्री खुर्ची’वरून नवा वाद निर्माण झाला आहे. आतिशी यांनीमुख्यमंत्री कार्यालयात प्रवेश करताच अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असताना ते ज्या खुर्चीवर बसायचे त्यावर बसल्या नाहीत, त्यांनी दुसऱ्या खुर्चीचा वापर करत बसल्या आणि म्हणाल्या, केजरीवाल यांची खुर्ची त्यांच्या येण्याची वाट पाहत आहे. दरम्यान, आतीशी यांच्या या कृत्याला भाजपाने संविधान विरोधी असल्याचे म्हटले आहे. भाजप खासदार मनोज तिवारी यांनी टोमणा मारला आणि म्हणाले, आतीशी यांना लिहिलेले माझे पत्र आता कोणती आत्मा वाचेल का?

एएनआयशी संवाद साधताना मनोज तिवारी यांनी ‘रिकाम्या खुर्ची’वर निशाणा साधत म्हणाले, केजरीवाल कधी येणार, त्यांना कोण आणणार, हा सर्व नंतरचा विषय आहे, परंतु आतीशी यांनी आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आता त्या जर रिकामी खुर्ची दाखवत असतील तर विचार करा किती प्रश्न निर्माण होतात. याचा अर्थ त्या स्वतःला सार्वभौम मुख्यमंत्री मानत नाहीत.

हे ही वाचा : 

ठाणे म्युनिसिपल ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

वर्षा गायकवाड, उद्धव ठाकरेंच्या कारस्थानामुळे धारावीत जमाव उतरला!

श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, ‘भारताशी संबंध दृढ करण्यासाठी वचनबद्ध’

तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची जानी मास्टरची कबुली

ते पुढे म्हणाले, जो स्वतः मुख्यमंत्री असून दुसऱ्याला मानतो तर तो मुख्यमंत्री पदाचा अनादर करत आहे, संविधानाचा अनादर करत आहे. जसे की मी आतीशी यांना पत्र लहिले तर ते आम्ही कोणत्या आत्म्याकडून वाचून घ्यायचे का?, हे कोण वाचणार, तुम्ही असे दाखवाल की कोणती आत्मा चालवेल चार महिने तर आमचे पत्र कोण वाचेल?. यावरून त्यांनी स्वतःला कठपुतली हे दाखवून दिले आहे.

Exit mobile version