‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटानंतर ‘७२ हुरें’ चित्रपटावरून वादाची ठिणगी उडाली आहे. या चित्रपटाचा टीझर प्रक्षेपित झाला असून चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याला आयएमडीबीवर ८.५ रेटिंग मिळाले आहे.
सोशल मीडियावरही या चित्रपटावरून विरोध सुरू झाला आहे. कशाप्रकारे निष्पाप तरुणांची दिशाभूल करून, त्यांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादाकडे ओढले जाते, असे या चित्रपटात दाखवले असल्याचे टीझरवरून दिसत आहे.
संजय पूरनसिंह यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मात्र हा चित्रपट म्हणजे इस्लामची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न असल्याची टीका काही जणांकडून होत आहे. तर, काहींनी या चित्रपटाला प्रोपोगंडा चित्रपट मानले आहे.
हे ही वाचा:
बीकॉम, मॅनेजमेंट, मास कम्युनिकेशन्स अभ्यासक्रमांना वाढता प्रतिसाद
बनावट ऑफर लेटरमुळे भारतीय विद्यार्थ्यांना कॅनडा सोडावा लागणार!
बंगालमधील कोरोमंडल अपघातग्रस्तांना दोन हजारांच्या चलनी नोटांमध्ये मदत
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टीमॉडेल विमानतळ असणार
या चित्रपटाच्या माध्यमातून दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही काहींनी केला आहे. चित्रपटाचे सह-दिग्दर्शक अशोक पंडित यांनी रविवारी चित्रपटाचा टीझर प्रक्षेपित करत तुम्हाला दिलेल्या वचनानुसार, तुमच्यासमोर ‘७२ हुरें’ चित्रपटाची पहिली झलक आणत आहोत. मला विश्वास आहे की, तुम्हाला हा चित्रपट आवडेल, असे म्हटले आहे. हा चित्रपट ७ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट याआधी चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला आहे. त्याआधारेच त्याला आयएमडीचे रेटिंग मिळाले आहे. टीजरमध्ये अजमल कसाब आणि ओसामा बिन लादेन यांची छायाचित्रे दाखवत यांनी अनेक निष्पापांचे जीव घेतले. कोणासाठी? ‘७२ हुर’साठी, असे म्हटले आहे. मात्र सोशल मीडियावर एका व्यक्तीने ’७२ हुरें’ केवळ मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी बनवली गेली आहे. जर त्यांना खरोखरच यामागील सत्य माहीत असते तर, त्यांनी कधीच इस्लाम धर्म स्वीकारला असता, अशी टीका केली आहे.