22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषराज्यपालांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून नाहक वाद उकरला

राज्यपालांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून नाहक वाद उकरला

राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे कडून या वक्तव्यावर उलट सुलट प्रतिक्रिया

Google News Follow

Related

शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श तर नितीन गडकरी सध्याचे आदर्श असे वक्तव्य राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याबद्दल उगाचच वाद निर्माण केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे कडून या वक्तव्यावर उलट सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एखादी व्यक्ती आपला आदर्श असू शकते आणि काळानुरूप या आदर्शात बदल होऊ शकतो या आशयाने राज्यपाल बोलले असावेत. पण माध्यमांनी मात्र तेवढेच विधान दाखवून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि नवीन वादाला तोंड फोडले आहे. राजकीय पक्ष आपल्या सोयीने या विधानाचा अर्थ लावून वाद निर्माण करत असल्याचे चित्र दिसत आहे.

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभ पार पडला. या प्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी आपलय भाषणात राज्यपाल म्हणाले , छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत. आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असं वाटतं तुम्हाला कोणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील.

हे ही वाचा : 

सजा की मजा! तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांनी घेतला मसाजचा आनंद

स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न

श्रद्धा वालकर, लव्ह जिहाद आणि हिंदू-मुस्लिम विवाह

धक्कादायक! समाजसेविकेनेच पाच दिवसांचे बाळ विकले

राज्यपालांच्या या विधानानंतर सगळीकडन उलटसुलट प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी, रोहित पवार, उद्धव ठाकरे गटाचे लक्ष्मण हाके, मनसेचे गजानन काळे, संभाजी ब्रिगेड यांच्या कडून टीका होताना दिसत आहे. पण राज्यपालांच्या भाषणात कुठेही शिवाजी महाराजांचा अपमान झाला असे दिसत नाही. शिवाजी महाराज जुन्या काळातील आहेत एवढच ते म्हणाले. शिवाजी महाराज आता आदर्श नाहीत असे ते बोलले नाहीत. जुन्या काळातील त्या सर्व आदर्श व्यक्ती आहेतच. पण आता काळानुसार त्यात झालेला फरक त्यांनी फक्त समजावून सांगितला. प्रत्येकाच्या मनात एक आपला आयकॉन असतो . तो आयकॉन नवीन काळातही असू शकतो. पण याचा अर्थ जुन्या काळातील आदर्श व्यक्तींना विसरले असा अर्थ होत नाही. राज्यपालांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून आपल्या प्रमाणे त्याचा अर्थ लावत आहेत असे दिसून येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा