यंदा कतारमध्ये सुरू असलेला फुटबॉल वर्ल्डकप अनेक कारणांमुळे वादग्रस्त झाला आहे. त्यात आता भर पडली आहे ती, लोकांना भडकाविणारा आणि मनीलॉन्ड्रिंग तसेच दहशतवादाला खतपाणी घालण्याचा गंभीर आरोप असलेला झाकीर नाईकची. या झाकीर नाईकला चक्क कतारने या वर्ल्डकपच्या निमित्ताने इस्लामचा प्रचार करण्यासाठी आमंत्रित केले.
भारतातून या झाकीर नाईकला आमंत्रित केल्यामुळे जगभरात त्यावर चर्चा होत आहे. मुळात वर्ल्डकपच्या तयारीच्या निमित्ताने तेथे कामगारांचे जे मृत्यू झाले त्यावरून कतार लक्ष्य ठरले आहे. समलैंगिकांना ज्या पद्धतीने वागणूक दिली जात आहे, स्पर्धास्थळी मद्यप्राशनास बंदी घालण्यात आली आहे. मजेची गोष्ट म्हणजे नाईकने एकदा व्यावसायिक फुटबॉल हा इस्लामसाठी पाप आहे, हराम आहे असे विधान केले होते.
हे ही वाचा:
श्रद्धाच शीर मैदान गढीतील तलावात, आरोपीची कबुली
त्याच्यासाठी तरी राहुल गांधी ‘पंतप्रधान’ होतील?
भारतीयांचा फोटो काढण्यास ‘ऑस्ट्रेलिया पोस्ट’चा नकार
‘वाहिन्यांवरील मराठी पत्रकार मुली साडी न नेसता शर्ट-ट्राउजर का घालतात?’
याच कतारने काही महिन्यांपूर्वी भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यावरून भारतावर टीका केली होती. त्यावेळी नुपूर शर्मा यांनी झाकीर नाईक यांच्याच वक्तव्याचा आधार घेऊन आपले म्हणणे मांडल्याचे म्हटले गेले होते. त्यामुळे मग कतारने त्यावर आक्षेप घेण्याचे कारण काय होते?
कतारचा पाकिस्तान, तुर्की आणि मलेशियावर मोठा प्रभाव आहे. दहशतवादासाठी एकत्र येण्यात त्यांना काहीही वाटत नाही. कतारकडून कट्टर मुस्लिमांना, दहशतवादाला खतपाणी घातले जात असल्याचे आरोप आहेत.
आता कतारनेच या भडकाऊ भाषण करणाऱ्या झाकीर नाईकला आमंत्रित केले आहे, त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.