काँग्रेस नेत्या प्रियंका वाड्रा यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत भाष्य करताना केलेल्या विधानांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सरकारच्या हिंदुत्ववादी धोरणांमुळे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दरी निर्माण होऊन हा हल्ला झाला, अशा आशयचे विधान त्यांनी केले आहे. यावरून संताप व्यक्त करण्यात येत असून भाजपानेही त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना रॉबर्ट वाड्रा यांनी मुस्लिम कमकुवत वाटत असल्याचे असे वक्तव्य केले. त्यांनी म्हटले आहे की, “मला खूप वाईट वाटत आहे आणि या दहशतवादी कृत्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल माझ्या तीव्र संवेदना आहेत. आपल्या देशात, आपण पाहतो की हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलते त्यामुळे अल्पसंख्याकांना अस्वस्थ वाटते आणि त्रास होतो. जर तुम्ही घडलेल्या या दहशतवादी कृत्याचे विश्लेषण केले तर, जर ते (दहशतवादी) लोकांची ओळख पाहत असतील, तर ते असे का करत आहेत? कारण आपल्या देशात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या संघटनांना असे वाटेल की, हिंदू हे सर्व मुस्लिमांसाठी समस्या निर्माण करत आहेत. ओळख पाहणे आणि नंतर एखाद्याची हत्या करणे, हा पंतप्रधानांना दिलेला संदेश आहे, कारण त्यांना मुस्लिम कमकुवत वाटत आहेत. अल्पसंख्याक कमकुवत वाटत आहेत. आपण आपल्या देशात सुरक्षित आणि धर्मनिरपेक्ष आहोत असे वाटत असेल पण, तसे घडत नाही,” असं रॉबर्ट वाड्रा म्हणाले.
रॉबर्ट वाड्रा यांच्या विधानावरून सर्वत्र संताप व्यक्त केला जात असतानाचं आता भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्या एक्स अकाऊन्टवर व्हिडिओ शेअर केला असून रॉबर्ट वाड्रा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “धक्कादायक! सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा हे निर्लज्जपणे दहशतवादी कृत्याचे समर्थन करतात, दहशतवाद्यांचा निषेध करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत आहेत. एवढ्यावरच थांबत नाहीत, उलट पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या अत्याचारांसाठी भारतावर दोषारोप करतात.”
Shocking! Sonia Gandhi’s son-in-law Robert Vadra shamelessly defends an act of terror, offering cover to the terrorists instead of condemning them. He doesn’t stop there, instead, shifts the blame onto India for the atrocities committed by Pakistani terrorists. https://t.co/3CQlCmewjn
— Amit Malviya (@amitmalviya) April 23, 2025
हे ही वाचा :
हिंदूंच्या अंगावर याल तर सगळे हिंदू तुमच्या अंगावर येवू, शक्ती कळायलाच हवी!
“कलमा म्हणू शकलो म्हणून वाचलो…” हिंदू प्राध्यापकाने सांगितली घटना
श्रीलंका ने त्रिकोणीय सीरीजसाठी टीम जाहीर केली!
मंगळवारी दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर गोळीबार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाड्रा यांचे हे विधान आले आहे. बंदी घातलेल्या दहशतवादी गट लष्कर-ए-तोयबा (एलईटी) ची एक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.