वादग्रस्त पत्रकार विनोद दुआ यांची प्रकृती गंभीर

वादग्रस्त पत्रकार विनोद दुआ यांची प्रकृती गंभीर

एनडीटीव्हीचे पत्रकार विनोद दुआ यांची प्रकृती गंभीर असून ते व्हेन्टिलेटरवर आहेत. त्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्यानंतर त्यांच्या मुलीने त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

विनोद दुआ हे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत. २०१८मध्ये ‘मी टू’ या चळवळीदरम्यान निष्ठा जैन यांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केले होते. ३० वर्षांपूर्वी आपला पाठलाग केल्याचा, लैंगिक शेरेबाजी केल्याचा आरोप जैन यांनी दुआ यांच्यावर केला होता. तेव्हा ते प्रकरण चांगलेच गाजले होते.

१९८९च्या त्या घटनेबद्दल जैन यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, दुआ यांच्या ‘जनवाणी’ या टीव्ही शोमध्ये नोकरी मिळविण्यासाठी जैन या दुआ यांच्याकडे गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी लैंगिक शेरेबाजी केली होती. त्यानंतर जैन यांनी अन्यत्र नोकरी मिळविली. पण दुआ यांना ही बाब समजल्यानंतर ते त्याठिकाणी जैन यांना भेटायला गेले. त्यांनी आपल्या कारमध्ये जैन यांना बसायला सांगितले आणि त्यांनी तिथे अत्यंत वाह्यात वर्तन जैन यांच्याशी केले. त्या कारमधून तडक बाहेर पडल्या. पण नंतर दुसऱ्या दिवशीही ते तिथे त्यांची वाट पाहात उभे होते. नंतर त्यांनी पाठलाग करणे सोडले, अशी माहिती जैन यांनी सदर वेबसाईटला दिली होती.

पुढे २०१७मध्ये चित्रपट अभिनेता अक्षय कुमारने दुआ यांच्या मुलीसंदर्भात एक शेरेबाजी केल्याचा आरोप करण्यात आल्यावर दुआ यांनी अक्षय कुमारवर टीका केली होती. त्यावरून जैन यांचा राग अनावर झाला आणि त्या म्हणाल्या की, ही व्यक्ती (दुआ) किती ढोंगी आहे, लैंगिक शेरेबाजी करण्यात, लैंगिक छळ करण्यात हा माणूस मागे नाही. मात्र इथे लैंगिक शोषणाबद्दल हा माणूस संताप व्यक्त करतो आहे.

२०१८मध्ये मी टू चळवळीने जोर पकडला होता आणि विविध क्षेत्रातील पुरुषांवर महिलांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते.

हे ही वाचा:

‘महिला विरोधी आघाडी सरकारचं वस्त्रहरण’

न्यूझीलंडने चिवट झुंज देत पराभव टाळला

या वयात ही परिस्थिती पाहावी लागल्याने निराशेतून पवारांचे ‘ते’ विधान

शिवसेना आमदार रमेश कोरगावकर यांची ‘कोरिओग्राफी’

 

हेच विनोद दुआ भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर म्हणाले होते की, एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडल्यावर लोक त्यांची स्तुती करतात, त्या व्यक्तीला मोठे करतात. पण अशावेळी त्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांसोबत त्यांचे दोषही लोकांसमोर यायला हवेत. यासंदर्भातला त्यांचा जुना व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. मात्र नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्याबाबत काही तथ्य मांडल्यावर मात्र हेच विनोद दुआ मरण पावलेल्या व्यक्तीबाबत असे बोलणे शोभत नाही, असे म्हणायला मागेपुढे पाहात नव्हते. याचाही व्हीडिओ व्हायरल होतो आहे. त्यातून त्यांच्या ढोंगीपणावर टीका होते आहे.

दुआ रुग्णालयात असताना आता तथाकथित पुरोगामी मंडळी आता त्यांचे महिमामंडन करण्यासाठी सरसावली असताना त्यांच्या वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाचे हे पैलू पुढे येऊ लागले आहेत.

Exit mobile version