पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या गैरव्यवहारामुळे आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या चर्चेत आहेत. पूजा खेडकर यांच्या आयएएसपदाच्या निवडीवर देखील आता बोट ठेवले जात आहे. दरम्यान, गाडीच्या तपासासाठी घरी गेलेल्या पोलिसांसमोरच पूजा खेडकर यांच्या आईने दमदाटी केल्याचे समोर आले आहे. मी सर्वांना आतमध्ये टाकेन, असे पूजा खेडकरांच्या आईने कॅमेरा समोर म्हटले आहे.
मनमानी कारभार करणाऱ्या पूजा खेडकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पूजा खेडकर यांच्या मालकीच्या असलेल्या ऑडी कारवर व्हीआयपी नंबर आणि लाल दिवा असल्याचे फोटोही व्हायरल झाले होते. याचा तपास घेण्यासाठी पुणे पोलीस पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत. मात्र, यावेळी पोलिसांसमोरच पूजा खेडकरांची आई मनोरमा खेडकर यांनी दमदाटी केल्याचे दिसले.
हे ही वाचा:
इमिग्रेशन एजंटच्या अटकेमुळे अमेरिकेला जाणाऱ्या मार्ग उघड
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणे पुरावा सादर करणार; पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले
‘भारताने जगाला युद्ध नाहीतर बुद्ध दिला’
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह नऊ जणांविरुद्ध तक्रार
एबीपी माझाच्या बातमीनुसार, चौकशीसाठी गेलेले पोलीस बंगल्याबाहेर दाखल होते. एबीपी माझाचे रिपोर्टर देखील हा संपूर्ण प्रकार कव्हर करत होते. मात्र, बंगल्याचा दरवाजा कोणीही उघडण्यास बाहेर आले नाही. त्याच दरम्यान पूजा खेडकरांची आई मनोरमा खेडकर या बाहेर आल्या आणि बातमी कव्हर करता असताना गेटच्या आतून कॅमेरावर पेन मारून कॅमेरा दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसही बाहेरच होते आणि सर्वांसमोर मनोरमा खेडकर यांनी येथून निघून जाण्यास सांगितले. येथून निघून जा नाहीतर सर्वांना आत टाकेन अशी धमकी देखील दिली आणि त्या बंगल्याच्या आत निघून गेल्या. हा सर्व प्रकार घडत असताना पोलिसांनी गेटच्या बाहेर उभे राहून बघत होते.