वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर या सध्या नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याविरोधात तक्रार दाखल दिली होती. या प्रकरणी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी दोन नोटीस बजावली. मात्र, त्या दोन्ही वेळेस गैरहजर राहिल्या. अखेर पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाहीये.
पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला होता. पूजा खेडकर यांचे अनेक कारनामे समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर केलेल्या छळाच्या आरोपावरून या प्रकरणाने वेगळे वळण घेतले होते. या प्रकरणी चौकशीसाठी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी दोन नोटीस बजावली होती. मात्र, त्या चौकशीसाठी हजर झाल्या नाहीत. पुणे पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाहीये. दिल्लीमध्ये गुन्हा दाखल झाल्याने अटकेच्या भीतीने पूजा खेडकर या नॉट रिचेबल झाल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा:
भारताच्या विकसित शताब्दीची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प
आमदार अतुल भातखळकर भाजपाच्या माध्यम विभागाचे केंद्रीय समन्वयक
‘नवरत्न’ अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब
अमित शहांनंतर शिंदे शिवसेनेचा उद्धव ठाकरेंवर प्रहार !
दरम्यान, पूजा खेडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न पुणे पोलीस करत आहेत. तर दुसरीकडे त्यांचे वडील दिलीप खेडकर हे देखील अद्याप फरार आहेत. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना नुकतेच अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.