गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या पुलाच्या दुर्घटनेला तेथील कंत्राटदार जबाबदार असल्याचे समोर आले आहे. या खासगी कंत्राटदाराने या पुलाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर लोकांच्या वापरासाठी खुला करण्यापूर्वी त्याला फिटनेस सर्टिफिकेट दिले नव्हते अशी माहिती समोर आली आहे.
मच्छू धरणावर हा पूल बांधण्यात आला आहे. सात महिन्यांपूर्वी हा पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता. पण ओरेव्हा ग्रुपला मार्चमध्ये या पुलाच्या नूतनीकरणाचे काम सोपविण्यात आले होते. झुलता पूल म्हणून ओळख असलेला हा पूल २६ ऑक्टोबरला गुजराती नववर्षानिमित्त खुला करण्यात आला. पण तो लोकांना वापरण्यास योग्य आहे अथवा नाही, याची कोणतीही खातरजमा न करताच तो वापरण्यास देण्यात आला.
मोरबी महापालिकेचे मुख्य अधिकारी संदीपसिंह झाला यांनी सांगितले की, हा पूल या कंत्राटदाराकडे सोपविण्यात आला होता जेणेकरून त्याने त्याची देखभाल करावी आणि त्याचा व्यवस्थित वापर होईल हे पाहावे. पुढील १५ वर्षांसाठी हे कंत्राट देण्यात आले होते.
हे ही वाचा:
शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ
केंद्राकडून महाराष्ट्राला या दोन प्रकल्पांची भेट
गुजरातमध्ये आता सगळे ‘एकसमान’, काय आहे समान नागरी कायदा?
पण या कंत्राटदाराने आम्हाला कोणतीही माहिती न देता तो पूल लोकांसाठी खुला केला. त्यामुळे आम्हाला या पुलाच्या सुरक्षिततेबाबत कोणतेही ऑडिट करता आले नाही. केवळ नूतनीकरण झाल्यानंतर त्या कंत्राटदाराने पूल लोकांना वापरण्यासाठी खुला केला. तेव्हा पालिकेने कोणतेही फिटनेस प्रमाणपत्र पुलाला दिले नव्हते. प्रथमदर्शनी त्या पुलावर जमलेले लोक पुलाच्या मध्यभागी जमा झाल्यामुळे अधिक ताण आला.
आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून गुजरात सरकारने कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे.