26 C
Mumbai
Wednesday, November 13, 2024
घरविशेष'अतुल भातखळकरांच्या लोकप्रियतेत सतत वाढ, रेकॉर्ड मार्जिनने होणार विजय'

‘अतुल भातखळकरांच्या लोकप्रियतेत सतत वाढ, रेकॉर्ड मार्जिनने होणार विजय’

भाजपा खासदार आणि भोजपुरी सुपरस्टार रवी किशन यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,  आरपीआय महायुतीचे लोकप्रिय लोकप्रिय उमेदवार अतुल भातखळकर यांच्या प्रचार यात्रांचा जल्लोष आहे. शनिवारी (९ नोव्हेंबर) गोरखपूरचे खासदार आणि भोजपुरी सुपरस्टार रवी किशन यांनी अतुल भातखळकर यांच्या प्रचारासाठी निघालेल्या रथयात्रेत हजेरी लावली आणि कांदिवलीतील हनुमान नगर येथील सभेला संबोधित केले. अतुल भातखळकरांची लोकप्रियता दहा वर्षांपासून सतत वाढत असून यावेळी त्यांचा विजय रेकॉर्ड मार्जिनने होणार असल्याचे भाजपा खासदार रवी किशन यांनी म्हटले.

कांदिवलीतील पोईसर पासून हनुमान नगर पर्यंतच्या रथयात्रेत लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासोबतच हनुमान नगर येथे तुफान गर्दी जमलेल्या जाहीर सभेत अभिनेता रवी किशन यांनी त्यांच्या प्रसिद्ध डायलॉग्स ने लोकांची मनं जिंकली. सभेला संबोधित करताना खासदार रवी किशन म्हणाले, मोदीजींच्या प्रेरणाने आणि तुमच्या आशीर्वादाने दोन वेळा गोरखपूरचा खासदार झालो. बाबा गोरखनाथ महाराजांच्या धरतीतून येथे आलो असून प्रधानमंत्री मोदींनी, योगी आदित्यनाथ या दोघांनी इथे अतुल भातखळकर यांच्या विजयाला हातभार लावायला मला पाठवलं असल्याचे त्यांनी सांगितले. अतुल भातखळकर यांचा सारखा लोकप्रिय नेता शोधून सापडणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्तुती करताना खासदार रवी किशन यांनी काँग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले, “काँग्रेसने देशावर ६५ वर्ष राज्य करून देश लुटला, आता कुठे मागच्या दहा वर्षात देश पुढे जाऊ लागला आहे. आपण धन्य आहोत नरेंद्र मोदींसारखे निस्वार्थ नेते आपल्याकडे आहेत. हजारो वर्षात असा निस्वार्थ नेता अवतरीत होतो जो देश बदलतो, देशाचा विचार बदलतो. मोदीजींनी विचार बदलला, आमच्यातला हिंदू, आमच्यातलं हिंदुत्व जागृत केलं, सनातन धर्म पुनरुज्जीवित झाल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार अतुल भातखळकर यांनी सभेच्या सुरुवातीला रवि किशन यांना निकाल लागल्यावर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी कांदिवली पुन्हा येण्याचा असा आग्रह केला होता, त्याला दुजोरा देत खासदार रवि किशन यांनी निकाल लागल्यावर महिन्याच्या अखेरला ढोल मंजिरा घेऊन येणार असं आश्वासन दिलं आहे. भोजपुरी सुपरस्टार रवी किशन यांनी मराठीत अतुलजींसाठी वोट मागितले. उत्तर भारतीय, मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्र सगळ्याच बंधूंना अतुल भातखळकरांना कमळा समोरील बटन दाबून विजयी करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. २० नोव्हेंबरला एक नंबरवर अतुल भातखळकर यांच्या नावासमोरील बटन फटाफट फटाफट दाबा की समोरच्या काँग्रेस उमेदवाराचं डिपॉझिट पण जप्त होईल, असे खासदार रवी किशन म्हणाले.

हे ही वाचा : 

राम मंदिराला विरोध, वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यासोबत उद्धव ठाकरे बसलेत

मॉब लिंचिंग झाले नसल्याच्या दाव्यानंतर आदित्य ठाकरेंवर समाजमाध्यमात टीकेचा भडीमार

सुन लो ओवैसी…संभाजीनगरचे नाव औरंगाबाद करणारा अजून जन्माला यायचा आहे!

लाडक्या बहिणींना प्रतिवर्षी २५ हजार २०० रु., कर्जमाफी, सन्मान निधीत वाढ; भाजपचा संकल्प

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच महायुतीचे उमेदवार अतुल भातखळकर यांनी सभेत बोलताना हनुमान नगर भागात केलेली कामे सांगितली, मी इथे दहा वर्ष आमदार आहे. हनुमान नगरच्या लोकांनी मला खूप साथ दिली आहे. मी इथे दहा वर्षात खूप काम केल आहे. सौरदिवे, नालेसफाई, शौचालय निर्मिती, रस्ते निर्माण, लादीकरण त्यामुळे हनुमान नगरची जनता माझ्यासोबत आहे याची मला खात्री आहे. पण मी इथे सांगायला आलोय की मागची दहा वर्ष तुमची ज्याप्रमाणे मी सेवा केली त्याचप्रमाणे पुढची पाच वर्ष तुमच्यात आशीर्वादाने आमदार झाल्यावरही करणार आहे. माझ्यात कोणताही बदल होणार नसल्याचे आमदार भातखळकरांनी स्पष्ट केले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा