‘७५ व्या संविधान दिना’निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी (२६ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले, भारतीयांना जलद न्याय मिळावा यासाठी नवीन न्यायिक संहिता लागू करण्यात आली आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच संविधान दिन साजरा करण्यात आल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, आपले संविधान आपल्या वर्तमान आणि भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. गेल्या ७६ वर्षात देशासमोर अनेक आव्हाने आली आहेत. परंतु, आपल्या संविधानाने प्रत्येक आव्हान सोडवण्यासाठी योग्य मार्ग दाखवला. राज्यघटनेला आणीबाणीचाही सामना करावा लागला. ‘आपल्या संविधानाने देशाच्या प्रत्येक अपेक्षा आणि गरजा पूर्ण केल्या आहेत.
हे ही वाचा :
‘निवडणूक जिंकल्यावर ईव्हीएम चांगलं, हरल्यावर ईव्हीएममध्ये गडबड’
काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक पडला बंद!
नवी मुंबईत १८ चाकी ट्रेलर चोरीला
‘बांगलादेशात हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करा’
संविधानाच्या ताकदीमुळे आज जम्मू-काश्मीरमध्ये बाबासाहेबांच्या संविधानाची पूर्ण अंमलबजावणी झाली आहे. पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला आहे. आज भारत एका मोठ्या बदलातून जात आहे आणि भारतीय संविधान आपल्यासाठी मार्गदर्शक बनले आहे.