31 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरविशेष'जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच संविधान दिन साजरा'

‘जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच संविधान दिन साजरा’

संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाषण

Google News Follow

Related

‘७५ व्या संविधान दिना’निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी (२६ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले, भारतीयांना जलद न्याय मिळावा यासाठी नवीन न्यायिक संहिता लागू करण्यात आली आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच संविधान दिन साजरा करण्यात आल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, आपले संविधान आपल्या वर्तमान आणि भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. गेल्या ७६ वर्षात देशासमोर अनेक आव्हाने आली आहेत. परंतु, आपल्या संविधानाने प्रत्येक आव्हान सोडवण्यासाठी योग्य मार्ग दाखवला. राज्यघटनेला आणीबाणीचाही सामना करावा लागला. ‘आपल्या संविधानाने देशाच्या प्रत्येक अपेक्षा आणि गरजा पूर्ण केल्या आहेत.

हे ही वाचा : 

‘निवडणूक जिंकल्यावर ईव्हीएम चांगलं, हरल्यावर ईव्हीएममध्ये गडबड’

काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक पडला बंद!

नवी मुंबईत १८ चाकी ट्रेलर चोरीला

‘बांगलादेशात हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करा’

संविधानाच्या ताकदीमुळे आज जम्मू-काश्मीरमध्ये बाबासाहेबांच्या संविधानाची पूर्ण अंमलबजावणी झाली आहे. पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला आहे. आज भारत एका मोठ्या बदलातून जात आहे आणि भारतीय संविधान आपल्यासाठी मार्गदर्शक बनले आहे.

ते पुढे म्हणाले, संविधानाच्या मूळ प्रतमध्ये भगवान राम आणि माता सीता यांची छायाचित्रे आहेत. चित्रे ही भारतीय संस्कृतीची प्रतीके आहेत ज्यामुळे ते आपल्याला मानवी मूल्यांची आठवण करून देतात. ही मानवी मूल्ये आजच्या भारताच्या धोरणांचा आणि निर्णयांचा आधार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात केलेल्या कामकाजाचा उल्लेखही केला.
२६/११ च्या मुंबई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली. २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे स्मरण करून पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण लोकशाहीच्या या महत्त्वाच्या पर्वाची आठवण करत आहोत, पण आजच्या दिवशीच मुंबईवर हल्ला झाला होता, हे आपण विसरू शकत नाही. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच भारताच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या प्रत्येक दहशतवादी संघटनेला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा