कोचिंगच्या बहाण्याने हिंदू विद्यार्थ्यांना ख्रिश्चन बनवण्याचा कट मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात उघडकीस आला आहे. येथील एका कोचिंग सेंटरमधून पोलिसांनी ११ अल्पवयीन मुलांची सुटका केली आहे. त्यांचे वय २ ते १७ वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदू संघटनेच्या तक्रारीवरून सोमवारी (१६ सप्टेंबर) २ महिलांसह एकूण ३ आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
मिडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना बैतूलच्या हमलावरपूर भागात घडली. येथे एक महिला कोचिंग सेंटर चालवते, ज्यामध्ये आसपासच्या भागातील अनेक अल्पवयीन विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. हिंदू संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक मालवीय यांनी सांगितले की, कोचिंगच्या नावाखाली अल्पवयीन मुलांना ख्रिश्चन बनवण्याचा कट रचल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या ठिकाणी अल्पवयीन मुला-मुलींचे ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी ब्रेनवॉश केले जात असल्याची माहिती आहे.
कोचिंग सेंटरमध्ये काही ख्रिश्चन साहित्य आणि धार्मिक पुस्तकेही सापडल्याचा दावा केला जात आहे. ही पुस्तके विद्यार्थ्यांना शिकवली जातात आणि धार्मिक कार्यक्रमातही त्यांचा समावेश केला जातो, असा आरोप होत आहे. तसेच या मुलांना ख्रिश्चन परंपरेनुसार प्रार्थनाही करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. या गोंधळाची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी येथून ११ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
हे ही वाचा :
गणेश उत्सवात जिहाद्यांकडून ११ ठिकाणी हल्ले
डब्यांसाठी प्रसिद्ध असलेला ब्रँड टप्परवेअर दिवाळखोरीत!
पुढच्या वर्षी लवकर या… २३ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाला भावूक निरोप
बुलढाणा; जळगाव जामोद शहरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक !
हिंदू सेनेच्या सदस्यांनी हा गंभीर गुन्हा मानला असून, धर्मांतराचा कट रचल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीत २ महिलांसह ३ जणांची नावे आहेत. पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायदा आणि एससी/एसटी कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कोचिंग सेंटरमधून अटक करण्यात आलेल्या महिला शिक्षिकेच्या वडिलांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. या कोचिंग सेंटरमध्ये खरच धर्मांतराचे धडे, धर्मांतर केले जायचे का?, याचा शोध पोलीस घेत आहेत.
#बैतूल-कोचिंग सेंटर में धर्मांतरण के खेल का खुलासा
हिंदू सेना, पुलिस ने कोचिंग सेंटर पर दी दबिश
धर्म सभा में 15 से ज्यादा नाबालिग बच्चे मिले
धर्म सभा को पादरी कर रहा था संचालित
धर्म सभा में दो ईसाई महिलाएं भी मिलीं#Betul #BreakingNews pic.twitter.com/VkW3s1HUgA— News18 MadhyaPradesh (@News18MP) September 16, 2024