25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषइंडिया गटातील काँग्रेसच्या जागावाटपाच्या योजनेला तीन राज्यांत अडथळा!

इंडिया गटातील काँग्रेसच्या जागावाटपाच्या योजनेला तीन राज्यांत अडथळा!

पंजाबमध्ये ‘आप’चा एकट्याने लढण्याचा निर्धार

Google News Follow

Related

आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर जागावाटप करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया गटाच्या बैठकीत घेण्यात आला. दिल्लीत झालेल्या बैठकीत मुख्य लक्ष्य हे जागा-वाटपात मतैक्य मिळवण्याबाबत होते. मात्र सध्या तरी काँग्रेससाठी हा मार्ग खडतर दिसत आहे.पंजाबमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाने आगामी लोकसभा निवडणूक एकट्याने लढवण्याचे ठरवले आहे. तर, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनेही ‘एकला चलो रे’चा मार्ग पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने २३ जागांची मागणी केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी तृणमूल काँग्रेस आगामी २०२४ची लोकसभा निवडणूक एकट्याने लढवेल, असा निर्धार केला आहे. ‘इंडिया गट हा देशभरात असेल तर, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल लढेल आणि भाजपचा पराभव करेल. बंगालमध्ये केवळ तृणमूल काँग्रेसच भाजपला धडा शिकवू शकते, अन्य दुसरा कोणताही पक्ष नाही,’ असे यावेळी बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ प. बंगालमध्ये तरी बॅनर्जी या काँग्रेस किंवा डाव्या आघाडीशी हात मिळवण्यास उत्सुक नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने सन २०१९ची लोकसभा निवडणूक एकट्याने लढवली होती. तेव्हा काँग्रेसला अवघ्या दोन जागा जिंकता आल्या होत्या. तर, तृणमूलचे २२ उमेदवार निवडून आले होते.

हे ही वाचा:

महत्त्वाच्या ‘सर्वोच्च’ निकालांचे ठरले २०२३ हे वर्ष

छत्रपती संभाजीनगरमध्ये कारखान्याला आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू

महाराष्ट्राच्या मुलींची कुमारी गट खोखोत ‘नऊ’लाई, मुलांचे १८वे विजेतेपद!

नव वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक; मुंबईत पोलीस अलर्ट मोडवर

उद्धव सेना यांची २३ जागांची मागणी
महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पक्षाची आगामी भारत न्याय यात्रा मणिपूरमधून निघणार असून तिचा समारोप मुंबईत होणार आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने लोकसभेच्या २३ जागा मागितल्या असून काँग्रेसने मात्र ही मागणी फेटाळून लावली आहे. घटकपक्षांनी थोड्या समजुतीने घेतले पाहिजे, अशी सूचना माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी केली आहे. सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितरीत्या निवडणूक लढली होती. तेव्हा ४८ पैकी काँग्रेसला अवघी एक जागा जिंकता आली होती. तर, राष्ट्रवादीला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले होते. तर, शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणुका लढल्या होत्या. तेव्हा भाजपने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या.

पंजाबमध्ये ‘आप’चा एकट्याने लढण्याचा निर्धार
पंजाबमधील काँग्रेस नेत्यांनी याआधीच एकट्याने निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. याबाबत काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वालाही सांगण्यात आले आहे. शीर्ष नेतृत्वानेही त्यांच्या मागणीचा विचार केल्याचे सांगितले जाते. तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १७ डिसेंबरला पंजाबमधील भटिंडामध्ये रॅली काढली होती. तेव्हा त्यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत सर्व १३ जागांवर ‘आप’ला निवडून देण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे ‘आप’ काँग्रेससोबत जागा वाटप करणार नाही, असे सध्या तरी दिसत आहे. सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पंजाबमधील आठ जागा जिंकल्या होत्या, तर आप केवळ एक जागाच जिंकू शकली होती. याचप्रकारे काँग्रेसला दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्येही जागावाटपासाठी चांगलीच रस्सीखेच करावी लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा