काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी हैदराबादमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ते ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना पाठिंबा देतील. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाने ओवेसी यांच्याविरोधात हैदराबादमधून कोम्पेला माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. ओवेसींना पाठिंबा देण्याचा काँग्रेसचा निर्णय अनेकांसाठी आश्चर्यकारक आहे. कारण कॉंग्रेसने एमआयएमला नेहमी भाजपची बी-टीम मानले आहे. राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांनी अनेकवेळा भाजप आणि ओवेसींवर निशाणा साधला आहे.
तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहम्मद फिरोज खान यांनी दावा केला की, तेलंगणातील बहुतांश जागा काँग्रेस जिंकेल. हैदराबाद शहराबद्दल बोलायचे झाले तर सिकंदराबाद आणि हैदराबाद लोकसभा आहेत. माझा मतदारसंघ हैदराबादमध्ये नसून सिकंदराबादमध्ये आहे. एआयएमआयएम आणि काँग्रेस पक्ष यांच्यात तडजोड झाल्यामुळे हैदराबाद ओवेसी जिंकतील.
हेही वाचा..
रश्मी बर्वेंना दणका; जात पडताळणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
परगाणा भागात इस्लामवाद्यांचा हिंदुंवर हल्ला
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची १०वी यादी आली समोर!
छत्तीसगढमध्ये बस दरीत कोसळली, १२ मजुरांचा मृत्यू!
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ओवेसींना पाठिंबा देत असली तरी पक्षाच्या नेत्यांनी वारंवार भाजप आणि ओवेसी यांची युती असल्याचा दावा केला आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना गांधी म्हणाले, “मोदींचे दोन मित्र आहेत, ओवेसी आणि केसीआर!” डिसेंबर २०१८ मध्ये गांधी म्हणाले होते, टीआरएस ही भाजपची “बी” टीम आहे आणि केसीआर नरेंद्र मोदींच्या तेलंगणा रबर स्टॅम्प म्हणून काम करतात. ओवेसींचा एमआयएम हा पक्सः भाजपची बी टीम आहे.