झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस नेत्याने घुसखोरांना स्वस्तात सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस नेते गुलाम मीर यांनी शेकडो लोकांसमोर मंचावरून उघडपणे हे वचन दिले आहे. त्यांच्या वचनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेसवर घुसखोरांना संरक्षण दिल्याचा आरोप केला आहे.
झारखंडमधील काँग्रेसचे प्रभारी गुलाम मीर यांनी बोकारो जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करताना हे वक्तव्य केले. येथील बर्मो विधानसभेत काँग्रेसचे उमेदवार जयमंगल सिंग उर्फ अनुप सिंग यांचा प्रचार करताना गुलाम मीर यांनी ४५० रुपयात एलपीजी सिलिंडर देणार असल्याचे म्हटले.
याबाबत बोलताना ते म्हणाले, १ डिसेंबरपासून गॅस सिलिंडर फक्त ४५० रुपयामध्ये मिळेल, यामध्ये ना हिंदू, ना मुस्लीम, ना घुसखोर किंवा अन्य कोणालाही बघितले जाणार नाही. झारखंडचा जो रहिवासी आहे, मग तो कोणत्याही विचाराचा, वर्गाचा असो, त्याला ४५० रुपयात सिलिंडर दिले जाईल, असे काँग्रेस नेता गुलाम मीर यांनी म्हटले.
हे ही वाचा :
मतदान अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या राजस्थानमधील उमेदवाराला अटक
भास्कर जाधव म्हणाले, काँग्रेसचे सुनील केदार म्हणजे मारुतीच्या बेंबीतला विंचू!
डॉमिनिका देशाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च सन्मान!
ठाकरेंना अदानींचं खाजगी विमान चालतं, एरव्ही अदानी खटकतात!
दरम्यान, काँग्रेस नेत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर भाजपाने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. गुलाम मीर यांचे वक्तव्य लाजिरवाणे असून काँग्रेस पक्ष घुसखोरांच्या पाठीशी उभा असल्याचे भाजपाने म्हटले.
भाजपचे प्रवक्ते प्रतुल शाह देव म्हणाले की, आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो की काँग्रेस घुसखोरांशी हातमिळवणी करत आहे आणि त्यांना या सरकारमध्ये संरक्षण मिळत आहे, अल्पसंख्याक तुष्टीकरणामुळे त्यांचे आधार कार्ड बनवले जात आहेत. आता तर काँग्रेसचे प्रभारी मीर साहेब आणि उमेदवार अनुप सिंग यांनी सिलिंडरचे आश्वासन दिले आहे.
गुलाम अहमद मीर बोल रहे हैं कि घुसपैठियों को भी 400 रुपए में गैस सिलेंडर देंगे। बगल में खड़े जयमंगल सिंह मुस्कुरा रहे हैं @2Rajababu @_Randhir_singh @yourBabulal @BikerGirlkancha @Anandkr1970 @akhileshsi1 pic.twitter.com/4kh0T90SJW
— Pankaj Prasoon (@prapankaj) November 14, 2024
कांग्रेस के झारखंड प्रभारी गुलाम मीर के बयान का भारतीय जनता पार्टी कड़ा प्रतिकार करती है जिसमें उन्होंने बांग्लादेशी के घुसपैठियों को 450 रुपए में गैस सिलेंडर देने की घोषणा की है।यह राष्ट्र विरोधी बयान है और सताधारी गठबंधन के घुसपैठियों के प्रति प्रेम को दिखाता है। इन्ही… https://t.co/R9hYOLyWHa pic.twitter.com/9AZvHGAsPc
— Pratul Shah Deo🇮🇳 (@pratulshahdeo) November 14, 2024