काँग्रेस तरुणांना ड्रग्जच्या अंधाऱ्या दुनियेत घेऊन जाऊ इच्छिते!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची टीका

काँग्रेस तरुणांना ड्रग्जच्या अंधाऱ्या दुनियेत घेऊन जाऊ इच्छिते!

दिल्लीमधून नुकतेच ५,००० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. बुधवारी (२ ऑक्टोबर) दक्षिण दिल्लीत टाकलेल्या छाप्यात ५,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ५०० किलो कोकेन आणि ४० किलो हायड्रोपोनिक गांजा पोलिसांनी जप्त केला होता. या प्रकरणी तुषार गोयल याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी तुषार गोयलचे काँग्रेसशी संबंध असल्याचे समोर आले होते. यावरूनच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस तरुणांना ड्रग्जच्या अंधाऱ्या दुनियेत घेऊन जाऊ इच्छित असल्याचे मंत्री शाह यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ट्वीटकरत म्हणाले, एकीकडे ‘ड्रगमुक्त भारत’साठी मोदी सरकार शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबत असताना दुसरीकडे, उत्तर भारतातून जप्त करण्यात आलेल्या ५,६०० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या खेपेत काँग्रेसच्या एका प्रमुख नेत्याचा सहभाग हे अत्यंत धोकादायक आणि लज्जास्पद आहे.

काँग्रेसच्या राजवटीत पंजाब, हरियाणा आणि संपूर्ण उत्तर भारतातील तरुणांची ड्रग्जमुळे झालेली अवस्था सर्वांनी पाहिली आहे. मोदी सरकार तरुणांना क्रीडा, शिक्षण आणि नवनिर्मितीकडे घेऊन जात असताना, काँग्रेसला त्यांना अंमली पदार्थांच्या अंधाऱ्या दुनियेत घेऊन जायचे आहे.

हे ही वाचा : 

गरबा कार्यक्रम प्रवेशासाठी आधार कार्ड सक्तीच्या मागणीला अतुल भातखळकरांचा पाठींबा

एन्काऊंटर स्पेशालिस्ट जरांगे…

पवन कल्याण म्हणतात, सनातन धर्म प्रमाणपत्र हवे!

लाडू प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या देखरेखीखाली करणार एसआयटी

ते पुढे म्हणाले, काँग्रेस नेत्याकडून आपल्या राजकीय प्रभावाने तरुणांना अंमली पदार्थांच्या दलदलीत ढकलण्याचे जे पाप केले जाणार होते, हे मोदी सरकार कधीही यशस्वी होऊ देणार नाही. अमली पदार्थ विक्रेत्यांची राजकीय स्थिती किंवा दर्जा न बघता, संपूर्ण ड्रग इकोसिस्टम नष्ट करून ‘ड्रगमुक्त भारत’ निर्माण करण्याचा आमच्या सरकारचा निर्धार आहे, असे मंत्री अमित शाह म्हणाले. दरम्यान, ड्रग्ज प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपीचा संबंध काँग्रेसने फेटाळून लावला आहे.

Exit mobile version