कर्नाटकात औरंगजेबाचे वाढते उदात्तीकरण, पण काँग्रेस,उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प!

भाजपा महाराष्ट्रने केली टीका

कर्नाटकात औरंगजेबाचे वाढते उदात्तीकरण, पण काँग्रेस,उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प!

१ ऑक्टोबर रोजी ईद-ए-मिलाद मिरवणुकीत इस्लामवाद्यांनी दगडफेक केल्यामुळे कर्नाटकातील शिवमोग्गा येथे जातीय तणावाचे ढग निर्माण झाले होते.या दगडफेकीत चार जण जखमी झाल्याचे वृत्त होते. औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे पोस्टर्स या मिरवणुकीच्या निमित्ताने झळकले. एकप्रकारे हिंदूंना खिजविण्याचा प्रयत्न तिथे झाला.

 

या घटनेवरून महाराष्ट्र भाजपाने ट्विट करत काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. महाराष्ट्रात सत्ता नाही तर काँगेसला छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. मात्र, सत्ता आहे तिथे औरंग्याचे महिमामंडण काँग्रेस करत आहे. औरंग्याचा आदर्श घेऊन सत्तेवर आलेली काँग्रेस हिंदुद्वेषी गरळ ओकत आहे आणि उद्धव ठाकरे यांना महाराजांची वाघनखे खरी वाटत नाहीत, असे ट्विट भाजपकडून करण्यात आले आहे.

 

वृत्तानुसार, मिरवणुकीत टिपू सुलतानचा कटआउट होता जिथे तो दोन “भगव्या रंगाच्या” हिंदूंना मारताना दाखवला होता. हिंदू संघटनांशी संबंधित कार्यकर्त्यांनी कटआउटवर आक्षेप घेतला आणि वाद निर्माण झाला.दगडफेकीच्या निषेधार्थ हिंदू रस्त्यावर उतरले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मिरवणूक थांबवल्यामुळे इस्लामवाद्यांनी दगडफेक केली. शिवमोग्गा एसपी जीके मिथुन कुमार यांनी दोन्ही समुदायातील स्थानिक नेत्यांशी संपर्क साधत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. याप्रकरणी पोलिसांनी ४३ दंगलखोरांना ताब्यात घेतले आहे. याबाबतचे व्हीडिओ समोर आले असून पोलिसांनी दंगलखोरांना चोख उत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्यावर तुफानी दगडफेक करण्यात आली. औरंगजेब, टिपू सुलतान यांच्या पोस्टर्सचे समर्थन करणाऱ्यांनी ही दगडफेक केली होती.

हे ही वाचा:

जमिनीच्या वादातून एकमेकांवर गोळीबार, ६ ठार!

गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरे काय म्हणाले?

एलॉन मस्क यांनी ट्रुडो यांच्याविरोधात थोपटले दंड!

पुण्यातील इसिस मॉड्यूल प्रकरणातील दहशतवाद्यास अटक

कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याबद्दल भाजपने काँग्रेस सरकारवर टीका केली. भाजपाने म्हटले की, कर्नाटकात औरंग्याचे उदात्तीकरण जोरात सुरू आहे. यावर काँग्रेस आणि नकली हिंदूत्व घेऊन फिरणारे उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प आहेत.’इंडी आघाडी’ आणि हिंदुद्वेष हे समीकरण रक्तात भिनलेले आहे सगळ्यांच्या, असे ट्विट भाजपा महाराष्ट्र या ट्वीटर पेजवर करण्यात आले आहे.

 

Exit mobile version