भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरूण चुग यांनी जेपी नड्डा आणि किरेन रिजिजू यांच्याविरुद्ध काँग्रेसने दिलेल्या विशेषाधिकार हनन नोटीसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, काँग्रेसने आधी संविधान बदलण्याची भाषा केली आणि आता आपल्या नेत्यांचे संरक्षण करत आहे.
भाजप नेते तरुण चुग म्हणाले, एक तर चोरी आणि वरून सीना जोरी! काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाची परिक्रमा करणे म्हणजेच पक्ष चालवणे आहे. डी. के. शिवकुमार यांनी गांधी कुटुंबाला खूश करण्यासाठी संविधान बदलण्याची भाषा केली, हे पूर्णपणे तुष्टीकरण असून जयराम रमेश यांनी शिवकुमार यांचे समर्थन करण्यास सुरुवात केली. गांधी-नेहरू कुटुंब संविधान बदलण्याच्या कटामागे आहे. काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आपला अजेंडा आणि झेंडा दोन्ही मुस्लिम लीगच्या कार्यालयात सरेंडर केला आहे.
हेही वाचा..
कुणाल कामराला पुन्हा खुमखुमी, नवे गाणे केले पोस्ट
सघन अभियानाने ‘टीबी मुक्त भारत’साठी मजबूत पाया
‘आदित्य ठाकरेंचा ड्रग्स व्यवसायाशी संबंध’, दिशा सालियन प्रकरणी लेखी तक्रार दाखल
भारतात दुध उत्पादनात १० वर्षांत ६३.६ टक्के वाढ
काँग्रेस संविधानाला किंमत देत नाही, जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा संविधानाचे उल्लंघन करून निर्णय घेतले गेले. त्यांचा उद्देश विशेष समुदायासाठी आरक्षण देऊन दलित, आदिवासी आणि ओबीसींचे अधिकार हिरावून घेणे आहे. धार्मिक आधारावर आरक्षण देणे संविधानविरोधी आहे आणि भारताच्या तत्त्वांशी विसंगत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी देखील याला विरोध केला होता.
बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूल सरकार मुस्लिम लीगच्या राष्ट्रविरोधी अजेंड्यावर चालत आहे. सीमावर्ती भागात हिंदू मतदारांची नावे काढली जात आहेत, तर बांगलादेशी घुसखोरांचे नाव मतदार यादीत घातले जात आहे. राहुल गांधी एका मंदबुद्धी बालकासारखे वागतात, ते परदेशी टूलकिटचा भाग बनले आहेत आणि कृत्रिम संभ्रम निर्माण करत आहेत. आरएसएस हे १०० वर्षांपासून राष्ट्रहितासाठी कार्यरत असलेले संघटन आहे. उच्च शिक्षण संस्थांमधील कुलगुरू कायद्यानुसारच नियुक्त केले जातात, राहुल गांधी यांचे वक्तव्य हे शैक्षणिक प्रक्रियेचा अपमान आहे.