भारताचा माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद याने सोशल मीडियावर द्वेष पसरवल्याबद्दल तथाकथित फॅक्ट चेकर मोहम्मद झुबेरवर टीका केली होती. मोहम्मद झुबेर हा फॅक्ट चेकच्या नावाखाली खोट्या बातम्या पसरवत असल्याबद्दल पकडला गेला होता. त्याने वेंकटेश प्रसादच्या बीसीसीआयवरील ट्विटवरून त्याला लक्ष्य केले होते. बीसीसीआयने वर्ल्डकपच्या तिकिटांच्या व्यवस्थापनावर टीका केली होती. त्यावरून मग प्रसादने झुबेरची योग्यताच बाहेर काढली. त्यावरून मग काँग्रेस आणि भाजपाविरोधकांनी वेंकटेश प्रसादला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. काँग्रेस प्रवक्ता श्रीनिवास बीव्हीने महान खेळाडूंची कशी घसरण होते, असे ट्विट करत वेंकटेश प्रसादवर टीका केली होती.
विदेशातील काँग्रेसचे सोशल मीडिया समन्वयक विजय थोटाथिल यांनी म्हटले की, आपल्या लहानपणीचे हिरो खाली घसरलेले पाहताना दुःख होते.काँग्रेसच्या तेहसीन पुनावालानेही मोहम्मद झुबेरची बाजू घेत वेंकटेश प्रसादवर टीका केली. वेंकटेश प्रसाद तुम्ही सगळ्यांचे हिरो आहात. पण इतरांच्या बाबतीत नकारात्मक होऊ नका. सातत्याने मोदीविरोधी व्यंगचित्रांसाठी प्रसिद्ध असलेले सतीश आचार्य यांनी म्हटले आहे की, मी तुमचा फॅन आहे पण तुम्ही वापरलेल्या भाषेमुळे मला दुःख झाले.
रेडिओ जॉकी न्यूज पेडलर सायेमाने हिने देखील यात उडी घेतली. तिने वेंकटेश प्रसादने वापरलेल्या भाषेवर आक्षेप घेताना स्वतः मात्र घाणेरड्या भाषेचा वापर केला. ती म्हणाली, “एक एक करून सर्व नायक पडले. किती निराशाजनक! तुमची भाषा बघा. किती आजारी मानसिकता! बेफिकीर आणि लज्जास्पद.”असे ट्विट केले आहे.
हे ही वाचा:
‘चिंतामणी’च्या मिरवणुकीत चोरट्यांचा जल्लोष
कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात आत्महत्या !
जळगावच्या भाषणात उद्धव ठाकरेंची जळजळ
जम्मू काश्मीरमध्ये प्राणार्पण केलेल्या हरमिंदर यांचा मुलगा झाला लेफ्टनंट
व्यंकटेश प्रसाद यांनी काही जणांना उत्तर दिले आहे. सतीश आचार्य याच्या ट्विटला उत्तर दिले की, कोणत्या भाषेने तुझे हृदय तोडले, सतीश. या व्यक्तीने आपला अजेंडा पेडलिंग, सोयीस्करपणे व्हिडिओ संपादित करणे, पैसे कमावण्यासाठी राजकीय पक्षाविरुद्ध निवडक आणि पक्षपातीपणे काम केल्याची पुरेशी उदाहरणे आहेत. तो वस्तुस्थिती तपासणारा आहे. यातील वास्तव पाहण्यासाठी आंधळे असण्याची गरज नाही.
काँग्रेस समर्थक तेहनसीन पूनावाला यालाही उत्तर दिले ते म्हणाले, प्रिय तहसीन, देवाने मला भरपूर दिले आहे आणि त्याने तुलाही दिले आहे. तथ्य-तपासणीच्या नावाखाली त्याच्या अजेंडा पेडलिंगसाठी आधीच अनेकांचे जीव धोक्यात घालून, तो त्याचा धडा शिकला नाही आणि नकळत कदाचित आपण त्याला त्याचा अजेंडा पुढे नेण्यास सक्षम करत आहात.