‘गांधीजींचे खरे अनुयायी असाल तर, काँग्रेस विसर्जित केली पाहिजे’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

‘गांधीजींचे खरे अनुयायी असाल तर, काँग्रेस विसर्जित केली पाहिजे’

महात्मा गांधीजींच्या जयंती निमित्त राज्यासह देशात अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सुरु केलेल्या ‘स्वच्छ भारत मिशन’ला देखील आज १० वर्ष पूर्ण झालीत. दरम्यान, मुंबईमध्ये काँग्रेस आणि मविआकडून आज शांतात रॅली काढण्यात आली. विरोधकांच्या या शांतात रॅलीला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली आहे. ‘गांधीजींचे खरे अनुयायी असाल तर, काँग्रेस विसर्जित केली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.

राज्यात अहिंसा नाही तर हिंसा सुरु आहे, असा आरोप आजच्या विरोधकांकडून काढण्यात आलेल्या मोर्च्यांमधून करण्यात आला, असा प्रश्न उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, मोर्चेमध्ये जितेंद्र आव्हाड होते का?, असा सवाल सुरवातीला केला. ते पुढे म्हणाले, जितेंद्र आव्हाड अहिंसेबद्दल बोलत होते, विसरले ते.. ठीक आहे, चांगल आहे अहिंसा असलीच पाहिजे, आमचे अहिंसेला सर्मथन आहे.

हे ही वाचा : 

२०५० पर्यंत भारत महासत्ता होईल

‘देशात ९० टक्के हिंदू राहतात, हिंदूंच्या हिताची काळजी घेणे गुन्हा नाही’

दिल्लीत २ हजार कोटी रुपयांचे ५०० किलोहून अधिक कोकेन जप्त!

मुस्लीम समुदायाच्या वकिलांना न्यायालयाने फटकारले

ते पुढे म्हणाले, खरे म्हणजे आज गांधी जयंती, हा आंदोलनाचा दिवसच नाहीये. गांधी जयंती हा शांतपणे तुम्हाला जर वाटत असेल तर बसून गांधीच्या विचारांवर, कार्यक्रमांवर आत्मचिंतन केले पाहिजे. परंतु, ज्या प्रकारे राजकीय उपयोग गांधींच्या नावाचा हे करतात, मी त्यांना केवळ एवढीच आठवण करून देवू इच्छितो, तुम्ही जर खरे गांधीजींचे अनुयायी असाल तर गांधीजींनी सूचना दिली होती की, स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची उपयोगिता संपली आहे, आता काँग्रेस विसर्जित केली पाहिजे, त्यामुळे त्या सूचनेचे त्यांनी पालन करावे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

Exit mobile version