शिवकुमार यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने माफी मागावी

प्रह्लाद जोशी यांची मागणी

शिवकुमार यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने माफी मागावी

कर्नाटकमध्ये उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या ‘संविधान बदलत आहे’ या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी यांनी या वक्तव्यावर टीका करत काँग्रेसवर हल्ला चढवला. दिल्लीतील संसदेच्या परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना प्रह्लाद जोशी म्हणाले, काँग्रेस आणि डी.के. शिवकुमार यांनी माफी मागावी. त्यांनी आपला गुप्त अजेंडा उघड केला आहे.

प्रह्लाद जोशी म्हणाले, काँग्रेसने नेहमीच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे आणि अनेक वेळा संविधानात बदल केले आहेत. काँग्रेसने वारंवार संविधानाचा अपमान केला आहे. त्यामुळे काँग्रेसने देशाची माफी मागावी. काही दिवसांपूर्वी डी.के. शिवकुमार यांना कर्नाटक सरकारच्या मुस्लिम आरक्षण धोरणावर न्यायालयात चाललेल्या प्रकरणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिले होते की, बघूया न्यायालय काय म्हणते. आम्ही काहीतरी सुरू केले आहे. संविधानात बदल होत आहेत आणि काही निर्णय संविधान बदलतात.

हेही वाचा..

कॅनडा म्हणतोय, भारत सार्वत्रिक निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करेल

येमेनमधील हुथी बंडखोरांवर हल्ले करण्यासाठीच्या ग्रुपमध्ये चुकून पत्रकाराला केलं समाविष्ट आणि…

काश्मीरमध्ये फुटीरतावाद इतिहास झाला!

जर्मनी आणि थायलंडचे आध्यात्मिक गुरु वाराणसीत

या वक्तव्यावरून भाजपने तीव्र विरोध दर्शवला आणि बेंगळुरूमध्ये शिवकुमार यांच्या पुतळ्याचे दहन केले. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनीही हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला. भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवकुमार यांच्यावर टीका करत त्यांना माफी मागण्याची मागणी केली. डी.के. शिवकुमार यांनी भाजपने त्यांच्या विधानाचा विपर्यास केला असल्याचा दावा केला आहे.

काँग्रेसचे खासदार इमरान मसूद यांनी भाजपच्या आक्षेपावर प्रतिक्रिया देताना म्हटले, भाजप बिनबुडाचे आरोप करत आहे. डी.के. शिवकुमार यांनी असे काहीही सांगितले नाही. संविधानात पूर्वीही सुधारणा झाल्या आहेत. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही. इमरान मसूद यांनी भाजपला लक्ष्य करत पुढे म्हटले, जे लोक संविधान बदलण्याची भाषा करत आहेत, ते ४०० जागांवरून २४० वर आले आहेत आणि त्यांना २४० वरून १०० वर यायला फारसा वेळ लागणार नाही.

 

Exit mobile version