‘घुसखोरांसोबत काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवले पाहिजे’

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे वक्तव्य

‘घुसखोरांसोबत काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवले पाहिजे’

आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे भाजपचे सहप्रभारी हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते गुलाम अहमद मीर यांच्या विधानावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. घुसखोरांना देखील एलपीजी सिलिंडर देणार असल्याचे काँग्रेस नेते गुलाम मीर यांनी म्हटले आहे, व्होट बँकेला खूश करण्यासाठी कांग्रेस हे सर्व करत असल्याचे मुख्यमंत्री सरमा यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, गुलाम अहमद मीर म्हणतात की ते घुसखोरांना एलपीजी सिलिंडर देणार आहेत, ते घुसखोरांना माती आणि मुलगी ( माटी और बेटी ) दोन्ही देत ​​आहेत कारण ती काँग्रेसची व्होट बँक आहे. ते पुढे म्हणाले, राहुल गांधींची ही भाषा आहे. कारण राहुल गांधींच्या संमतीशिवाय गुलाम अहमद मीर असे काही बोलू शकत नाहीत. घुसखोरांसोबतच काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे, असे मुख्यमंत्री सरमा यांनी म्हटले.

झारखंडमधील काँग्रेसचे प्रभारी गुलाम मीर यांनी बोकारो जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करताना घुसखोरांना देखील स्वस्तात सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. ते म्हणाले, १ डिसेंबरपासून गॅस सिलिंडर फक्त ४५० रुपयामध्ये मिळेल, यामध्ये ना हिंदू, ना मुस्लीम, ना घुसखोर किंवा अन्य कोणालाही बघितले जाणार नाही. झारखंडचा जो रहिवासी आहे, मग तो कोणत्याही विचाराचा, वर्गाचा असो, त्याला ४५० रुपयात सिलिंडर दिले जाईल.

हे ही वाचा : 

अहो, आश्चर्यम्… विळा-भोपळा एकत्र आला; एका सुरात बोलले जरांगे-मुंडे

पंतप्रधान मोदी भाजपाच्या १ लाख बूथ प्रमुखांशी साधणार संवाद!

गृहमंत्री शहांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, म्हणाले, भाजपा सर्व नियमांचे पालन करते!

कॅनडामध्ये खलिस्तानी मोर्चात सामील झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला क्लीन चीट

दरम्यान, काँग्रेस नेत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर भाजपाने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. गुलाम मीर यांचे वक्तव्य लाजिरवाणे असून काँग्रेस पक्ष घुसखोरांच्या पाठीशी उभा असल्याचे भाजपाने म्हटले.

 

Exit mobile version