कमलनाथ यांना काँग्रेसने नाकारले राज्यसभेचे तिकीट, म्हणून…

कमलनाथ यांना काँग्रेसने नाकारले राज्यसभेचे तिकीट, म्हणून…

New Delhi, May 7 (ANI): Madhya Pradesh Chief Minister Kamal Nath addresses a press conferance at his residence in Bhopal on Tuesday. (ANI Photo)

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, त्यांचा मुलगा नकुल आणि अन्य खासदार भाजपमध्ये जात असल्याच्या चर्चेने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. कमलनाथ यांना राज्यसभेचे तिकीट नाकारल्यामुळेच ते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘कमलनाथ कदाचित भाजपमध्ये जातील. काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. कमल नाथ हे राज्यसभेचे तिकीट मिळवण्यासाठी कसून प्रयत्न करत आहेत,’ अशी माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुल हे भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या सातत्याने संपर्कात असल्याचे समजते. कमलनाथ शनिवारी दिल्लीत दाखल झाल्यानंतर या चर्चेला तोंड फुटले. भाजपच्या प्रवेशाबाबत त्यांना छेडले असता, असे काही असल्यास मी प्रथम प्रसारमाध्यमांना सांगेन, असे ते म्हणाले.

अशाप्रकारे पक्ष बदलण्याच्या वृत्ताचे तुम्ही खंडन करत नाही आहात का, असे विचारले असता, ‘हा नकाराचा प्रश्न नाही. तुम्हीच असं म्हणताय, तुम्हीच खूप उत्तेजित झाला आहात. मी या बाजूला किंवा त्या बाजूसाठी उत्तेजित नाही. मात्र असे काही असल्यास मी तुम्हाला प्रथम कळवेन,’ असे कमलनाथ म्हणाले. काँग्रेस पक्षाने कमलनाथ यांची समजूत काढण्याचे सर्वपरीने प्रयत्न केले, असेही सूत्राने सांगितले.

‘मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून सिंधिया यांच्याऐवजी कमलनाथ यांची निवड केली गेली. परंतु ते पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार त्यांच्या हट्टीपणामुळे कोसळले. तरीही पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली आणि त्यांना विधानसभा निवडणुकीचा चेहरा बनवले गेले. मात्र दिल्लीतून पाठवलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्यांनी सहकार्य करण्यास नकार दिला,’ अशी माहिती या सूत्राने दिली.

हे ही वाचा:

शिवकालीन दांडपट्ट्याला ‘राज्यशस्त्र’ म्हणून मिळणार दर्जा!

कोटामध्ये १८ वर्षीय विद्यार्थी बेपत्ता

कमलनाथ यांच्यानंतर मनीष तिवारीही भाजपच्या संपर्कात?

गृहनिर्माण संस्थांच्या विविध प्रश्नांसाठी सोमवारी राष्ट्रीय अधिवेशन

‘ज्येष्ठ नेते जेपी अग्रवाल हे प्रभारी म्हणून कमलनाथ यांना नको होते. त्यामुळे त्यांनी त्यांना सहकार्य करण्यास नकार दिला. रणदीप सुरजेवाला यांची नियुक्ती केल्यानंतरही कमलनाथ यांनी त्यांच्या मनमर्जीप्रमाणे तिकीटवाटप आणि विधानसभा निवडणुकीचा एककल्ली पद्धतीने प्रचार केला,’ असेही या सूत्रांनी सांगितले.

मध्य प्रदेशात २३० जागांपैकी १६० जागांवर भाजपने विजय मिळवला तर, काँग्रेसला अवघ्या ६० जागा मिळवता आल्या. त्यानंतर कमलनाथ यांना मध्यप्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. कमलनाथ यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन राज्यसभेचा अर्ज मिळावा, अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यंनी काही आमदारांचाही आपल्याला पाठिंबा असल्याचे दाखवले होते. मात्र काँग्रेसनेत्यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली.

कमलनाथ हे छिंदवाडातून नऊवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा मुलगा नकुलनाथ सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाला होता. तर, भाजपने उरलेल्या सर्व २८ जागा जिंकल्या होत्या.

Exit mobile version