28 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषकाँग्रेसचे कुंभानी बेपत्ता, ८ उमेदवारांची माघार अन आता भाजपात प्रवेशाच्या बातम्या!

काँग्रेसचे कुंभानी बेपत्ता, ८ उमेदवारांची माघार अन आता भाजपात प्रवेशाच्या बातम्या!

भाजपच्या सुरत विजयामागे दडलंय काय?

Google News Follow

Related

सूरत येथील काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवार अर्ज बाद झाल्यानंतर भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली.नीलेश कुंभानी यांचा उमेदवार अर्ज बाद झाल्यानंतर इतर आठ उमेदवारांनीही अर्ज मागे घेतला.यानंतर भाजपचे मुकेश दलाल यांना विजयी घोषित करण्यात आले.दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी हे सध्या बेपत्ता असून त्यांच्याशी संपर्क देखील होत नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत.त्यामुळे वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत.

भाजपचे मुकेश दलाल विजयी झाल्याच्या एक दिवसानंतर काँग्रेसचे नीलेश कुंभानी आऊट ऑफ कव्हरेज आहेत.त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र, संपर्क होत नसल्याचे बातम्या समोर येत आहेत. तसेच नीलेश कुंभानी हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत.दरम्यान, कुंभानी भाजपमध्ये सामील होऊ शकतात असा दावा करणाऱ्या वृत्तांदरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या बंद घराबाहेर “जनता का गद्दार (जनतेचा गद्दार)” असे पोस्टर घेऊन निषेध केला आहे.तसेच बिनविरोध विजयाची स्क्रिप्ट आधीच तयार होती, असा आरोपही या कार्यकर्त्यांनी केला आहे.

हे ही वाचा:

वेंकय्या नायडू, राजदत्त, उषा उथुप, मिथुन चक्रवर्ती यांना पद्म पुरस्कार प्रदान

‘जिथे हिंसाचार झाला तिथे निवडणुकांना परवानगी नाही’

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांची सुटका नाहीच; तिहारमधील मुक्काम वाढवला

श्रीकांत शिंदेंनी स्वतः गायली हनुमान चालीसा!

दरम्यान, भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना काल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून विजयी घोषित करत प्रमाणपत्र देण्यात आले.सुरतमध्ये भाजपचा पहिला लोकसभेत बिनविरोध विजय झाल्यानंतर नाट्यमय घटना घडत आहेत.मुकेश दलाल यांच्या विजयावर काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी आक्षेप घेत याबाबत निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्याचे सांगितले.ते म्हणाले की, काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद होणे आणि इतर आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेणे हा काही योगायोग नाही.दरम्यान, काँग्रेसचे नीलेश कुंभानी हे सध्या बेपत्ता असून त्यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.तसेच हे सर्व आधीपासूनच ठरलेलं होत का? हे नीलेश कुंभानी समोर आल्यानंतरच समजू शकेल.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा