24 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषकाँग्रेस आमदार सुखपाल सिंह खैरा यांना ड्रग्ज प्रकरणी पंजाब पोलिसांकडून अटक!

काँग्रेस आमदार सुखपाल सिंह खैरा यांना ड्रग्ज प्रकरणी पंजाब पोलिसांकडून अटक!

राजकीय हेतूने अटक करण्यात आली आहे, खैरा

Google News Follow

Related

पंजाब पोलिसांनी गुरुवारी काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंग खैरा यांना चंदीगडमधील त्यांच्या बंगल्यावर छापे टाकून एका जुन्या ड्रग्जशी संबंधित प्रकरणात अटक केली आहे.पोलिसांनी छापा टाकला तेव्हा आमदार सुखपाल सिंह खैरा हे फेसबुकवर लाइव्ह आले होते.

अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत काँग्रेस आमदार सुखपाल सिंह खैरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.दाखल करण्यात आलेल्या जुन्या गुन्ह्याच्या संदर्भात जलालाबाद पोलिस स्टेशनच्या अधिकार्‍यांनी सुखपाल सिंह खैरा यांच्या सेक्टर ५ च्या निवासस्थानावर पहाटे छापा टाकत खैरा याना अटक करण्यात आली आहे.

छाप्यांदरम्यान खैरा फेसबुकवर लाइव्ह आले, ज्यामध्ये ते पोलिसांशी वाद घालताना दिसत आहे.खैरा यांच्या कुटुंबातील एका सदस्याने हे फेसबुकवर लाइव्ह केले यामध्ये पोलिसांना वॉरंटची मागणी करताना आणि त्यांच्या अटकेचे कारण विचारताना दिसत आहे.व्हिडिओमध्ये जलालाबादचे डीएसपी अच्छू राम शर्मा हे खैरा याना सांगत आहेत की, आपल्याला जुन्या एनडीपीएस प्रकरणी अटक केली जात आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याचा दावा खैरा यांनी केला आणि अटकेला विरोध केला.राजकीय हेतूने मला अटक करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला, हे सर्व व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाले आहे.

आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अटकेला विरोध करत होते, साध्या गणवेशात आलेले पोलीस अधिकारी खैरा यांना ताब्यात घेतले. खैरा हे पंजाबमधील भोलाथ मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आणि अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.मार्च २०१५ मध्ये त्याच्यावर फाजिल्का येथील जलालाबाद येथे ड्रग्जचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि नंतर त्यांना नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले.

हे ही वाचा:

कोल्हापुरात दोन मंडळांमध्ये राडा; दगडफेकीत तीन जखमी

जमीन गहाण टाकून ७५ लाखांच्या घोड्याची खरेदी; सुवर्णपदक विजेत्या घोडेस्वारांची कमाल!

सन २०२४ आणि २०२९मध्ये ‘एक देश, एक निवडणूक’वर उमटू शकते मोहोर!

नगरसेवकांचा सहानुभूतीवर भरोसा नाय काय?

या प्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते मलविंदर सिंग कांग यांनी गुरुवारी खेहराच्या अटकेवर सांगितले की, पंजाबमधील लोक दीर्घकाळापासून अंमली पदार्थांच्या व्यसनाचे बळी आहेत. आज पंजाब पोलिसांनी काँग्रेस नेते सुखपाल सिंह खेहराला ड्रग्ज प्रकरणी अटक केली आहे. एसआयटीच्या तपासात खेहरा अंमली पदार्थांच्या तस्करीत सामील असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस आणि तपास यंत्रणा कायद्यानुसार त्यांचे काम करतील.

काँग्रेस, शिरोमणी अकाली दलाकडून निषेध
खैरा यांच्या अटकेवर काँग्रेस नेते प्रताप सिंग बाजवा यांनी निषेध करत आम आदमी पक्षाच्या (आप) नेतृत्वाखाली असणाऱ्या पंजाब सरकारवर त्यांनी टीका केली.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बोलाथचे आमदार सुखपाल खैरा यांची अटक अत्यंत खेदजनक आहे. आप सरकारने सर्वकाळ खालच्या पातळीवर जाऊन सूडाचे राजकारण केले आहे, असे ट्विट बाजवा यांनी केले.

“काँग्रेस आमदार सुखपाल सिंह खैरा यांची नुकतीच झालेली अटक हा राजकीय सूडबुद्धीचा सूर आहे, हा विरोधकांना धमकावण्याचा प्रयत्न आहे आणि मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा पंजाब सरकारचा डाव आहे. आम्ही सुखपाल खैरा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदरसिंग वॉरिंग यांनी ट्विट केले.शिरोमणी अकाली दलाने या अटकेला “राजकीय सूड” म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा