काँग्रेसचे आमदार फूलसिंग बरैया यांनी स्वतःच्या तोंडाला फासले काळे!

भाजपला राज्यात ५० जागा मिळाल्या तर स्वतःच्या तोंडाला काळे फासण्याची केली होती घोषणा

काँग्रेसचे आमदार फूलसिंग बरैया यांनी स्वतःच्या तोंडाला फासले काळे!

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर काँग्रेस नेते फूलसिंग बरैया चर्चेत आले. भाजपला राज्यात ५० जागा मिळाल्या तर तोंड काळे करू, असे ते म्हणाले होते. त्यासाठी त्यांनी तारीख आणि ठिकाणही सांगितले होते. ७ डिसेंबर रोजी भोपाळ राजभवनासमोर दुपारी २ वाजता हाताने तोंड काळे करू, असे सांगण्यात आले होते.

भांडेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकलेले फूलसिंग बरैया यांनी दिलेल्या ७ डिसेंबर या निश्चित तारखेनुसार माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि पक्षाचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांसह राजभवनाबाहेर पोहोचले.येथे दिग्विजय सिंह यांनी आमदार फूलसिंग बरैया यांच्या तोंडावर काळे टिळक लावले.नुसतं तोंडावर काळे टिळक लावल्याने फूलसिंग बरैया यांनी दिग्विजय सिंह यांना सांगितले की, तोंडावर अधिक काळे फासा.मात्र, दिग्विजय सिंह यांनी तसे करण्यास नकार दिला.यावेळी दोन्ही नेत्यांसोबत पक्षाचे कार्यकर्तेही हसताना दिसले.

हे ही वाचा:

हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरची अधिवेशनात ‘एन्ट्री’!

करणी सेनाप्रमुखाच्या हत्येप्रकरणी दोन पोलिस निलंबित

मद्य कंपनीवर धाड, नोटा मोजता मोजता यंत्रे बिघडली!

केसीआर यांना धोबीपछाड देणाऱ्या काँग्रेसच्या रेवंथ रेड्डींनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

आज तकशी बोलताना फूलसिंग बरैया म्हणाले की, लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काजळ आहे.जे आश्वासन दिले होते ते पूर्ण केले आहे. दिग्विजय सिंह यांनी नकार दिला होता पण मला माझे वचन पूर्ण करायचे होते. लोकशाहीसाठी माझा आणि काँग्रेसचा लढा सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, फुलसिंग बरैया यांनी भांडेर मतदारसंघातून २९ हजार ४३८ मतांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपचे उमेदवार घनश्याम पिरौनिया यांचा पराभव केला आहे. रक्षा संतराम सिरोनिया यांनी २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर ही जागा जिंकली होती. यानंतर रक्षा सिरोनिया यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला.

Exit mobile version