२२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यास उपस्थित राहण्यास नकार दिल्याबद्दल आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी कॉंग्रेस पक्षाची खिल्ली उडवली आहे. कॉंग्रेसने आपली पापे कमी करण्यास मिळालेली सुवर्णसंधी गमावली आहे.
हेही वाचा..
मेहबुबा मुफ्तींच्या गाडीचा अपघात, थोडक्यात बचावल्या!
मुलाचा मृतदेह लपवून नेणारी सुचाना सेठ बेंगळुरूमधील वाहतूककोंडीमुळे अडकली
सीबीआयने नितीमत्ता समितीच्या अहवालाची प्रत मागवली
लालकृष्ण अडवाणी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार
हा पक्ष निमंत्रण देण्यास सुद्धा पात्र नाही, असे ते म्हणाले. विहिंपने काँग्रेस पक्षाला आमंत्रण देऊन त्यांचे पाप कमी करण्याची सुवर्णसंधी दिली होती. सुरुवातीपासूनच त्यांचे मत राममंदिराच्या विरोधात आहे. काँग्रेसने बुधवारी उद्घाटनाला आरएसएस/भाजप इव्हेंट म्हटले आणि भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या कार्यक्रमाला निवडणुकीच्या फायद्यासाठी राजकीय प्रकल्प बनवल्याचा आरोप केला.यावर सरमा म्हणाले, हे आमंत्रण स्वीकारून ते हिंदू समाजाची लाक्षणिक माफी मागू शकले असते. सरमा यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचा विषयही उपस्थित केला. पंडित नेहरू यांनी जे सोमनाथ मंदिराबाबत केले तसेच आताच्या कॉंग्रेस नेतृत्वाने राम मंदिराच्या बाबतीत केले आहे. इतिहास त्यांना कायम हिंदुविरोधी पक्ष ठरवत राहील.