काँग्रेसची भारत जोडो यात्रा २ जानेवारीमध्ये सुरू होण्याची शक्यता!

उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रावर विशेष लक्ष

काँग्रेसची भारत जोडो यात्रा २ जानेवारीमध्ये सुरू होण्याची शक्यता!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा पुढील वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या भारत जोडो यात्रा २ मध्ये सहभागी चालत तसेच, गाड्यांमधूनही सहभागी होणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेच्या दोन मार्गांवर विचारमंथन सुरू आहे. जर त्यावर शिकामोर्तब झाल्यास ईशान्य राज्यांतून या यात्रेची सुरुवात होईल. यावेळी विशेष लक्ष उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रावर केंद्रित केले जाईल, असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर येत असल्याने सहकारी विरोधी पक्षांतील महत्त्वाच्या चेहऱ्यांनाही या यात्रेत सहभागी करून घेण्याचा विचार आहे. पहिल्या यात्रेप्रमाणेच दुसऱ्या यात्रेतही ठिकठिकाणी राहुल गांधी यांच्या सार्वजनिक सभा घेतल्या जाणार आहेत. २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणी गटाच्या बैठकीत या प्रस्तावित यात्रेबद्दल चर्चा केली जाईल.

हे ही वाचा:

यवतमाळमध्ये जावयाने पत्नी, सासरा आणि दोन मेहुण्यांना संपवलं

८०० रेल्वे प्रवाशांची ४८ तासांनी सुटका

‘राहुल गांधी यांना बाहेर काढण्याचे चक्रव्यूह’

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतिपदासाठी अपात्र

७ सप्टेंबर, २०२२ ला भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली होती. त्यावेळी तमिळनाडूमधील कन्याकुमारीपासून यात्रेला प्रारंभ झाला होता. सुमारे चार हजार ८० किमीचे अंतर कापून या यात्रेची सांगता जानेवारी, २०२३मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये झाली होती. १२६ दिवसांत या यात्रेने १२ राज्यांतील ७५ जिल्हे पादाक्रांत केले होते. भारतातील सर्वाधिक लांबीची पदयात्रा असा विक्रम या यात्रेने केला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या यात्रेचा मुख्य हेतू भाजपच्या दुहीच्या राजकारणाविरोधात भारताला एकत्र करणे हा आहे, असे काँग्रेसने म्हटले होते.

Exit mobile version