पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भोपाळमधील सभेत लोकांना संबोधित करताना काँग्रेसला गंजलेल्या लोखंडाची उपमा दिली.तसेच, काँग्रेस जिकडे गेली, त्या राज्याची नासधूस केली. पक्षाकडे भविष्याचा विचार नाही. विकासाच्या प्रत्येक प्रकल्पावर काँग्रेस टीका करते.भारताला मिळत असलेले यश हे काँग्रेसला बघवत नाही.काँग्रेसला देशाला पुन्हा विसाव्या शतकात घेऊन जायचे आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.
जनसंघाचे सहसंस्थापक दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी सोमवारी मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) ‘कार्यकर्ता महाकुंभ’ येथे सभा घेतली.त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, मध्य प्रदेशातील काँग्रेस राजवटीचे वैशिष्ट्य म्हणजे रणनीती, कोट्यवधींचा भ्रष्टाचार आणि गैरकारभार होता. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने मध्य प्रदेशात दीर्घकाळ राज्य केले, पण संसाधनांनी समृद्ध मध्य प्रदेशला काँग्रेसने आजारी बनवले. तरुणांनी मध्य प्रदेशला गहू उत्पादक राज्य म्हणून पाहिले आहे. तरुणांनी मध्य प्रदेशकडे शिक्षणाचे उदयोन्मुख केंद्र म्हणून पाहिले आहे.
आगामी निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेसला संधी मिळाली, तिथे काँग्रेसने नासधूस केली. आगामी काही वर्षे मध्य प्रदेशच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. मध्य प्रदेश विकसित बनवण्याची हीच वेळ आहे, असंही मोदी म्हणाले.तसेच मध्य प्रदेशात २० वर्षांहून अधिक काळ भाजपचे राज्य आहे.मध्य प्रदेशातील सध्याचे तरुण नशीबवान आहेत की, त्यांनी काँग्रेस सरकारचा वाईट कारभार पाहिला नाही.स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने मध्य प्रदेशात दीर्घकाळ राज्य केले परंतु काँग्रेसने आजारी राज्य बनवल्याचे पण आता तसे होऊ देणार नाही, मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
भारतीय वायुदलात ‘सी-२९५’ वाहतूक विमान दाखल!
पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त !
किरीट सोमय्यांना कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
नरेंद्र मोदींनी बाईक बंद करायला सांगितली तरच करणार!
हजारो कोटींच्या घोटाळ्याचा पक्ष
प्रधानमंत्री मोदी पुढे म्हणाले की, अशा महत्त्वाच्या वेळी काँग्रेससारखा घराणेशाही पक्ष, हजारो कोटींच्या घोटाळ्यांचा इतिहास रचणारा पक्ष, व्होटबँक खुश करणार्या पक्षाला संधी मिळाली, तर मध्य प्रदेशाचे मोठे नुकसान होईल. काँग्रेसने लोकशाहीला कुटुंबव्यवस्था म्हटले. काँग्रेसचे राजकारण गरिबी आणि वंचितांवर फोफावते. ज्यांच्याकडून त्यांना मते मिळाली, त्यांनाच लाभ द्यायचा. आज जग भारताविषयी जे काही बोलले जाते, ते याआधीही बोलले गेले असते, पण काँग्रेस केवळ एका कुटुंबाचे गुणगान करण्यात व्यस्त राहिली. काँग्रेसने भारतातील भ्रष्ट व्यवस्थेचे पोषण केले. काँग्रेसने अशी व्यवस्था निर्माण केली की, व्यवस्थेने नेहमीच गरिबांना हात पसरवण्यास भाग पाडले. काँग्रेसने देशाला अन्न, वस्त्र, निवारा यात अडकवून ठेवले. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना या अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी भाजप सरकार सतत काम करत असल्याचे मोदींनी सांगितले.
चांदीचा चमचा घेऊन जन्मलेल्या त्यांच्या नेत्यांना गरिबांचे काही देणं-घेणं नाही. काँग्रेस नेत्यांसाठी गरिबांचे जीवन पर्यटन आहे. त्यांच्यासाठी ही झोपडपट्टी पिकनिक आणि व्हिडिओ शूटिंगचे ठिकाण बनले आहे. गरीब शेतकऱ्याचे शेत काँग्रेससाठी फोटो सेशनचे मैदान बनले आहे. यापूर्वीही त्यांनी असेच केले होते, आजही ते तेच करत आहेत. महिला आरक्षण विधेयकावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसचे गर्विष्ठ मित्र हा कायदा रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांची विचारसरणी आजही बदललेली नाही, हे लोक खूप अस्वस्थ आहेत. काँग्रेसचे लोक फक्त नकारात्मकता पसरवतात. काँग्रेसला ना स्वतःला बदलायचे आहे ना देश बदलू द्यायचा आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
ते म्हणाले की, भाजपचे “डबल इंजिन सरकार” अथकपणे काम करत आहे जेणेकरून मध्य प्रदेशातील लोकांना पुन्हा त्याच दिवसांना सामोरे जावे लागणार नाही.असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सुमारे १३.५ कोटी लोकांना गरिबीतून मुक्त केल्याचा दावा पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले, “भाजपने १३.५ कोटी लोकांना गरिबीतून मुक्त केले आहे. ते मध्य प्रदेशच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.मोदींनी दिलेली आश्वासने ही कधीही रिकामे जात नसल्याचे, मोदींनी सांगितले.